शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा मंत्री लोणीकर गोंधळले

By admin | Updated: December 17, 2014 06:17 IST

उल्हास नदीवरील पाणी नियोजनात करण्यात आलेल्या कपातीच्या प्रश्नावर उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर चांगलेच गोंधळले.

नागपूर : उल्हास नदीवरील पाणी नियोजनात करण्यात आलेल्या कपातीच्या प्रश्नावर उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर चांगलेच गोंधळले. मंत्र्यांना सुरुवातीपासूनच एकाही प्रश्नाचे उत्तर देणे जमले नाही. यामुळे सभागृहात सरकारवर नामुष्कीची वेळ आली. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांची बाजू सावरली. या प्रश्नावर लोणीकर यांच्या खात्याशी संबंधित सर्व उत्तरे स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिली. प्रश्नोत्तराच्या तासात आ. रुपेश म्हात्रे यांनी ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी पाणी नियोजनात दाखविण्यात आलेल्या १५ टक्के तुटीचा प्रश्न उपस्थित केला. ही कपात करू नये अशी मागणी करीत पाणीपुरवठ्यासाठी टँकरची संख्या वाढविणार का, असा प्रश्न त्यांनी केला. यावर उत्तर देताना पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची भंबेरी उडाली. काय बोलावे हे त्यांना सूचतच नव्हते. हे पाहून सभागृहातील सदस्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. यावर अध्यक्षांनी मंत्र्यांना सांभाळून घ्या, अशी सूचना सदस्यांना केली. मंत्री गोंधळल्यामुळे सरकारची होत असलेली नामुष्की पाहून परिस्थिती सावरण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उठले व कपात कालावधी मोठा असल्यामुळे मागणी एवढे टँकर देऊ, असे सांगितले. यानंतर अजित पवार यांनी वरच्या धरणात पाणी कपात करण्यात आल्यामुळे उल्हास नदीत पाणी कपात केली का, अशी विचारणा मंत्र्यांना केली. पवारांची ही गुगली लक्षात येताच पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस लागलीच मंत्र्यांच्या बचावासाठी उठले व उपलब्ध पाण्याचा अंदाज काढून कपात केली जाते, असे स्पष्ट केले. पुढील सर्व प्रश्नांची उत्तरे फडणवीस यांनीच दिली. मंदा म्हात्रे यांनी उल्हास नदीचे पाणी चोरून एका फार्महाऊसमध्ये वळविण्यात आल्याची तक्रार केली. (प्रतिनिधी)