शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमच्या शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: March 22, 2017 02:17 IST

वाशिमच्या क्रांतिवीर लहूजी विद्या मंदिर या शाळेतील भानुदास खंदारे या सहायक शिक्षकाने मंगळवारी आझाद मैदानातील झाडावर चढून फाशी घेण्याचा प्रयत्न केला.

मुंबई : वाशिमच्या क्रांतिवीर लहूजी विद्या मंदिर या शाळेतील भानुदास खंदारे या सहायक शिक्षकाने मंगळवारी आझाद मैदानातील झाडावर चढून फाशी घेण्याचा प्रयत्न केला. गळ्यात दोरी टाकून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या खंदारे यांची आझाद मैदान पोलिसांनी योग्यवेळी समजूत काढून अनुचित प्रकार टाळला. तब्बल १५ मिनिटे चाललेल्या या गोंधळामुळे सीएसटी परिसरात एकच गर्दी जमली होती.शाळा विनाअनुदानित असताना १९९२ खंदारे या शाळेत रुजू झाले होते. अनुसूचित जातीच्या प्रवर्गांचे शिक्षक म्हणून संस्थेने त्यांचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र अकोला शिक्षण विभागाने अप्रशिक्षित असल्याचे कारण देत त्यांचा प्रस्ताव नाकारला. मात्र त्या वेळी अनेक शाळांमध्ये अप्रशिक्षित शिक्षकांना मान्यता दिल्याचे निदर्शनास आणल्यानंतर खंदारे यांना मान्यता मिळाली. १९९७ साली शाळेला अनुदान मिळाले. त्या वेळी खंदारे यांची सेवा कायम करण्याऐवजी मुख्याध्यापकाने त्यांना प्रथामिकहून माध्यमिक वर्गांवर धाडले. शिवाय खंदारे यांच्या जागी दुसऱ्याच शिक्षकाची भरती केली. खंदारे यांनी सांगितले की, प्रामाणिकपणे शाळेची सेवा करत होतो. २ जून २००० साली अप्रशिक्षित शिक्षकांना सेवेत घेण्याचा शासन आदेश निर्गमित झाला. त्या वेळी मुख्याध्यापकांनी जाणीवपूर्वक डावलले. त्यामुळे डी.एड.चे शिक्षण घेतले. मात्र त्यानंतरही शिक्षण विभागाने अनुदानित तुकडीवर घेतले नाही. अखेर ३१ मे २००७ रोजी १५ वर्षांची सेवा मान्य करून विभागाने पदाला मान्यता दिली. १ जुलै २०११ रोजी सेवासातत्य झाल्याचे शिक्षणाधिकारी यांनी पत्र दिले. २१ जानेवारी २०१३ रोजी माध्यमिक वर्गांच्या तुकड्यांना २० टक्के अनुदान मंजूर झाले. त्यामुळे वनवास संपण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र मुख्याध्यापकांनी येथेही अन्याय करत वेतन फाईल शिक्षण विभागाकडे पाठवलेली नाही. अशा परिस्थितीत मुख्याध्यापकावर कारवाई करण्याऐवजी शिक्षण विभाग दोषींना पाठीशी घालत असल्याचा खंदारे यांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)