शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

म्युकर मायकोसिसच्या संकटातूनही मार्ग निघाला; गडकरींनी बजावली मोलाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 9:27 PM

वर्ध्यातील कंपनी तयार करणार म्युकर मायकोसिस आजारावरील इंजेक्शन; १५ दिवसांत उत्पादन सुरू होणार

वर्धा: राज्यासह देशावर कोरोनाचं संकट असताना त्यात म्युकर मायकोसिसची भर पडली. म्युकर मायकोसिसच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. या आजारावरील औषधं उपलब्ध होत असल्यानं समस्या वाढत आहेत. या परिस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रयत्नानं वर्ध्यात म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शनची निर्मिती होणार आहे. महाराष्ट्र, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये सध्या म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीत वर्ध्यात या आजारावरील इंजेक्शन्सची निर्मिती होणार आहे. वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनी म्युकर मायकोसिसवरील एम्फोटेरीसीन बी इंजेक्शन तयार करणार आहे. या कंपनीला राज्याच्या एफडीएनं परवानगी दिली आहे. पुढील १५ दिवसांत कंपनी इंजेक्शनचं उत्पादन सुरू करेल. यामध्ये नितीन गडकरींनी मोलाची भूमिका बजावली आहे. गेल्या काही दिवसांत राज्याच्या अनेक शहरांमध्ये म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळून आले आहेत. नितीन गडकरींच्या कार्यालयानं म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शनच्या निर्मितीबद्दल ट्विटरवरून माहिती दिली आहे. 'एम्फोटेरीसीन बीचं एक इंजेक्शन ७ हजार रुपयांना मिळतं. एका रुग्णाला ४० ते ५० इंजेक्शन्स दिली जात आहेत. त्यामुळे लोकांना ही इंजेक्शन्स सहज उपलब्ध होत नाहीत. वर्ध्यात तयार होणारं इंजेक्शन १२०० रुपयांत मिळेल. एका दिवसात २० हजार इंजेक्शनची निर्मिती करण्यात येईल,' अशी माहिती गडकरींच्या कार्यालयानं ट्विटरवरून दिली आहे.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्याNitin Gadkariनितीन गडकरी