शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

जागांचा छप्पर फाडके ‘बोनस’

By admin | Updated: July 28, 2014 01:26 IST

बारावीच्या निकालात झालेली वाढ लक्षात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावे यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने राज्य शासनाच्या निर्देशांनुसार २०१४-१५ या सत्रात मंजूर प्रवेश क्षमतेच्या

विद्यापीठाचे महाविद्यालयांना पत्र : यंदाच्या वर्षासाठी प्रवेश क्षमतेत २५ टक्क्यांनी वाढनागपूर : बारावीच्या निकालात झालेली वाढ लक्षात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावे यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने राज्य शासनाच्या निर्देशांनुसार २०१४-१५ या सत्रात मंजूर प्रवेश क्षमतेच्या १० टक्के जास्त प्रवेशास मंजुरी दिली. परंतु ‘मागेल त्याला प्रवेश’ या धोरणांतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा यासाठी विद्यापीठाकडून महाविद्यालयांना २५ टक्केपर्यंत प्रवेश क्षमता वाढवून देण्यासाठी मंजुरी देण्याची तयारी विद्यापीठाने दाखविली आहे. यासंदर्भात विद्यापीठाने महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र लिहून कळविले आहे.यंदा बारावीचा निकालात १६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत बीए, बीकॉम, बीएसस्सी सारख्या पारंपरिक अभ्यासक्रमांना महत्त्व आले. विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये याकरिता राज्य शासनाने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम ८३ (३)(क) नुसार विद्यापीठाच्या प्रवेशक्षमता मंजुरीच्या अधिकारांतर्गत मंजूर प्रवेशक्षमतेच्या १० टक्के जास्तीच्या प्रवेशाचे निर्देश देण्यात आले. परंतु गरज पडल्यास महाविद्यालयांना जागा वाढवून देण्यात याव्यात, असे निर्देश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी विशेषाधिकारात महाविद्यालयांना २५ टक्केपर्यंत जास्त प्रवेशास मंजुरी देण्यास मान्यता दिली आहे.यादी जोडणे आवश्यक जागावाढीसंबंधी महाविद्यालयांनी लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावे. यासंबंधी प्रस्ताव सादर करताना महाविद्यालयांना मंजूर क्षमतेनुसार प्रथम वषार्तील प्रवेशित विद्यार्थ्यांची यादी आणि प्रतीक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रमाणित करून प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक राहील. त्यानुसार महाविद्यालयांना प्रवेश क्षमता वाढवून देण्यात येईल. ही वाढीव क्षमता चालू सत्रासाठीच राहणार असल्यामुळे महाविद्यालयांना कुठल्याही प्रकारची नवीन तुकडी तसेच अतिरिक्त पद मंजूर केले जाणार नाही, अशा सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.(प्रतिनिधी)