शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सत्तापक्ष नेत्यासाठी आणखी दोन दिवसांची प्रतीक्षा

By admin | Updated: September 9, 2014 01:16 IST

महापालिकेत सत्तापक्ष नेते पदावरून भाजपमध्ये जोरात रस्सीखेच सुरू आहे. पदासाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व भाजपचे महामंत्री संदीप जोशी व कर निर्धारण समितीचे अध्यक्ष गिरीश देशमुख

नागपूर : महापालिकेत सत्तापक्ष नेते पदावरून भाजपमध्ये जोरात रस्सीखेच सुरू आहे. पदासाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व भाजपचे महामंत्री संदीप जोशी व कर निर्धारण समितीचे अध्यक्ष गिरीश देशमुख यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. सोमवारी सत्तापक्ष नेत्याविना महापौर, उपमहापौरांचे पदग्रहण झाले. या सोहळ्यात शेवटी प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांनी मौन सोडले. दोन दिवास सत्तापक्ष नेत्याची घोषणा केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.महापौर निवडीसाठी बोलाविलेल्या सभेतच सत्तापक्ष नेत्याची घोषणा केली जाईल, असे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांनी या पदासाठी कुठलाही वाद नसून लवकरच नियुक्ती केली जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे त्यानंतरही निवड झाली नाही. पदग्रहणापूर्वी तरी घोषणा होईल, असे वाटत होते, पण तसेही झाले नाही. नवनियुक्त महापौर प्रवीण दटके, उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांचा पदग्रहण सोहळा सोमवारी सकाळी महापालिकेत पार पडला. या सोहळ्यासाठी भाजपचे जवळपास सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लोकमतने सोमवारच्या अंकात ‘सत्तापक्ष नेत्याविना महापौरांचे पदग्रहण’ या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या वृत्ताची एकच चर्चा होती. शेवटी महापौरांच्या पदग्रहणात बोलताना फडणवीस यांनी वृत्तपत्रांच्या बातम्यांचा आधार घेत, या विषयावरील मौन सोडले. फडणवीस म्हणाले, दटके यांनी सत्तापक्ष नेते पद सक्षमतेने सांभाळले. त्यामुळे त्यांच्या जागी तेवढाच सक्षम व तोडीचा नेता द्यावा लागेल. हा सर्व विचार करून आमचे नेते याबाबतचा निर्णय घेणार असून दोन दिवसात तो जाहीर करू, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे प्रेक्षकांच्या पहिल्याच रांगेत संदीप जोशी व गिरीश देशमुख हे दोन्ही दावेदार बसले होते. फडणवीस यांनी या विषयाला हात घालत दोन दिवसाची डेडलाईन दिल्यामुळे पुन्हा एकदा इच्छुक अधिक सक्रिय होतील, अशी चर्चा भाजप वर्तुळात रंगली होती. (प्रतिनिधी)