शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विमानतळाला ‘टेक आॅफ’ची प्रतीक्षा

By admin | Updated: May 2, 2015 01:07 IST

गेल्या १५ वर्षांपासून केवळ चर्चेचा विषय ठरलेले व पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळ नक्की

पुणे : गेल्या १५ वर्षांपासून केवळ चर्चेचा विषय ठरलेले व पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळ नक्की केव्हा ‘टेक आॅफ’ घेणार याबाबत सध्यातरी सर्वच स्तरांवर संदिग्धताच आहे. शासनाने पुणे शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे किमान स्मार्ट सिटीच्या पार्श्वभूमीवर तरी पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चाकण विमानतळ सुरुवातीपासूनच वादात सापडल्याने गेल्या १५ वर्षांपासून केवळ चर्चेचा विषय राहिला आहे. शासनाने पुणे आणि लगतच्या जिल्ह्यांतील औद्योगिक व कृषी विकासाच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १९९७ला हे विमानतळ राजगुरुनगरपासून १२ किलोमीटर दक्षिणेस असलेल्या चाकण येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पुण्यातील लष्करी तळाला त्याचा अडथळा येत असल्याने शासनाने हा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर खेड तालुक्यातच चाकणच्या उत्तरेस पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या शिरोली-चांदूस परिसरात विमानतळासाठी जागेचा सर्वे करण्यात आला. जागा देण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला, तसेच येथील डोंगराळ भाग विमानतळासाठी तांत्रिकदृष्ट्या गैरसोयीचा असल्याचा अभिप्राय एमएडीसीने (महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी) दिला. त्यामुळे विमानतळासाठी पुन्हा नव्याने जागेचा शोध सुरू झाला आणि कडूस-पाईट येथे विमानतळ करता येईल का, याबाबत विचार सुरू झाला. ही जागा विमानतळासाठी योग्य असल्याचा अभिप्राय तांत्रिक समितीने दिला आहे. परंतु येथेदेखील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने राजगुरुनगरच्या पूर्वेस ‘सेझ’च्या जागेत विमानतळ करता येईल, असा प्रस्ताव पुढे आला आहे. परंतु याबाबतदेखील गेली दोन वर्षे काहीच निर्णय होऊ शकला नाही. त्यात राज्य शासनाने सेझसाठी संपादित करण्यात आलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)