शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बेस्ट कामगारांची प्रतीक्षा संपली

By admin | Updated: March 22, 2017 02:36 IST

संपाचे हत्यार उपसण्याची तयारी सुरू होताच बेस्ट प्रशासनाने कर्मचाऱ्यांना मंगळवारी पगार दिला. फेब्रुवारी महिन्याचा पगार तब्बल २० दिवसांनंतर हाती

मुंबई : संपाचे हत्यार उपसण्याची तयारी सुरू होताच बेस्ट प्रशासनाने कर्मचाऱ्यांना मंगळवारी पगार दिला. फेब्रुवारी महिन्याचा पगार तब्बल २० दिवसांनंतर हाती आल्यामुळे कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र आर्थिक संकटात असलेल्या बेस्टच्या तिजोरीवर कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी १४० कोटी रुपयांचा भार पडला आहे.कर्जबाजारी असलेल्या बेस्ट उपक्रमामध्ये कर्मचाऱ्याचा पगार प्रत्येक महिन्याच्या ८ ते १० तारखेपर्यंत होतो. मात्र या वेळेस २० दिवस उलटले तरी पगार होत नसल्याने बेस्ट कर्मचारी हवालदिल झाले होते. बँकांकडून कर्ज काढून दर महिन्यात पगार दिला जातो. मात्र या वेळेस काही हालचालीच नसल्याने कामगारांचे टेन्शन वाढले होते. अखेर पगारासाठी संपाचे हत्यार कामगार संघटनांनी उपसले. त्यानुसार २२ मार्चपासून बंद पुकारण्याची तयारी बेस्टमध्ये सुरू झाली होती.महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मध्यस्थी करून बेस्ट कामगारांचा पगार २१ व २२ मार्चपर्यंत मिळेल, असे जाहीर केले होते. त्यानुसार बेस्टच्या वाहतूक विभागाचे कामगार, वाहनचालक, कंडक्टर तसेच विद्युत पुरवठा विभागाचे कर्मचारी अशा ३१ हजार कामगार-कर्मचाऱ्यांचा पगार मंगळवारी झाला आहे. तर अधिकारी वर्गाचा पगार बुधवारी दिला जाणार आहे. बेस्टमध्ये ४४ हजार कामगार व अधिकारी वर्ग आहे. (प्रतिनिधी)