शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

वडाळा रोड ते बॅलार्ड पियर प्रस्ताव निर्णयाविना

By admin | Updated: February 23, 2015 03:13 IST

सीएसटीवरील ताण कमी करण्यासाठी हार्बरचा विस्तार बॅलार्ड पियरपर्यंत करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) घेतला आहे

मुंबई : सीएसटीवरील ताण कमी करण्यासाठी हार्बरचा विस्तार बॅलार्ड पियरपर्यंत करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) घेतला आहे. यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीचा वापर केला जाणार असून अद्याप त्यावर तोडगा निघालेला नसल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. सीएसटी ते अंधेरी तसेच पनवेल, वाशीपर्यंत हार्बरचा पसारा आहे. अंधेरीपर्यंत असलेली हार्बर गोरेगाव आणि त्यानंतर बोरीवलीपर्यंत वाढविण्यात येणार आहे. गोरेगावपर्यंत विस्ताराचा प्रकल्प एमयुटीपी-२ मध्ये तर बोरीवलीपर्यंत विस्ताराचा प्रकल्प एमयुटीपी-३ मध्ये समावेश करण्यात आला आहे. यातील हार्बरवरील गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचे काम सुरु असून येत्या काही महिन्यात ते पूर्ण होईल, अशी माहीती रेल्वे अधिकाऱ्यांकडून वारंवार देण्यात येत आहे. या प्रकल्पात ओशिवरा या नविन स्थानकाचा समावेश केला जाणार आहे. डाऊन दिशेला हार्बरचा विस्तार होत असतानाच अप दिशेला म्हणजे बॅलार्ड पियरपर्यंतही त्याचा विस्तार करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला आहे. या प्रकल्पानुसार वडाळा स्थानक हा बॅलार्ड पियअला जोडण्यात येईल. प्रकल्पाचा एमयुटीपी-३ मध्ये नव्याने समावेश करण्यात आला असून प्रकल्पासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट्रची जमिन लागणार आहे. त्यासाठी पोर्ट ट्रस्टकडे रेल्वेची बोलणीही सुरु असून यासाठी राज्य सरकारकडेही बोलणी केली जात आहे. (प्रतिनिधी)