शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागतात बारा तास

By admin | Updated: November 4, 2014 02:35 IST

कार्तिकी एकादशीनिमित्त सोमवारी पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. दर्शनबारीतून गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना १२ तास लागत आहेत

दीपक होमकर, पंढरपूरकार्तिकी एकादशीनिमित्त सोमवारी पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. दर्शनबारीतून गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना १२ तास लागत आहेत. दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री कडाक्याची थंडी अशा परिस्थितीत भाविक दर्शनबारीत उभे राहून पांडुरंगाचे दर्शन घेत होते.पंढरपुरात सुमारे तीन लाख भाविक आले आहेत. अनेक भाविक एकादशीची वाट न पाहताच दोन दिवस आधीच दर्शनासाठी रांगेत उभे राहिले होेते. मंदिरामध्ये चपला, मोबाइल, कॅमेरा, पर्स नेण्यास बंदी असल्याने भाविक अनवाणीच रांगेत उभे राहतात; मात्र त्यांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासन आणि मंदिर समितीकडून लाकडी बॅरिगेट्स बांधण्यापलीकडे कोणतीच व्यवस्था करण्यात आली नसल्याचे यानिमित्ताने प्रकर्षाने जाणवले.बारीची सुरुवात ज्या तात्पुरत्या स्वरूपाच्या मांडवापासून होते तेथेच खाली गवत आणि छोटे काटेही असल्याने तेथूनच भक्तांची दिव्य परीक्षेला सुरुवात होते. पहिल्या मंडपातून बाहेर पडायलाच सुमारे तास लागतो तर सगळे पत्राशेड संपवून बाहेर येण्यास तब्बल पाच तास लागत आहेत. दर्शन मंडपात तब्बल सात मजले चढून परत उतरण्यासाठी तब्बल दोन तास लागतात. अखेर दोन तासांनी रांग विठ्ठल मंदिराच्या छतावर पोहोचल्यावर तेथून अर्धा तासात विठ्ठलाच्या चरणाजवळ भाविक पोहोचतात. केवळ एका सेकंदासाठी चरणाजवळ थांबलेला भाविक पोलिसांकडून गाभाऱ्याबाहेर ढकलला जातो; मात्र त्या सेकंदामध्येच झालेले दर्शन आणि चरणस्पर्श भाविकांचा बारा तासांचा शीण घालवतो. विठ्ठलाचा मानाचा वारकरी म्हणून पूजा करण्याची संधी मिळावी ही आमची इच्छा होती. ती इच्छा विठ्ठलाने पूर्ण केली. आमच्या जीवनाचे सार्थक झाले, अशी प्रतिक्रिया सुरेश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)