शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात आजपासून ‘व्हिजिटिंग मॅनेजमेंट सिस्टिम’

By admin | Updated: December 31, 2014 00:18 IST

उपविभागीय कार्यालयाचा राज्यात पहिला प्रयोग.

डॉ. किरण वाघमारे / अकोला : कार्यालयात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे समाधान व्हावे, त्याला त्याचे काम कधी होणार याची माहिती असावी यासोबतच बिनकामी येणार्‍यांवर चाप बसण्यासाठी येथील उपविभागीय कार्यालात ३१ डिसेंबर पासून व्हिजिटिंग मॅनेजमेंट सिस्टिम सुरु करण्यात येत आहे. अशा प्रकारची सेवा देणारे हे राज्यातील पहिले प्रशासकीय कार्यालय ठरणार आहे. उपविभागीय कार्यालयात दररोज विविध कामांसाठी लोक येत असतात. अनेकवेळा त्यांची कामे करुन घेण्यासाठी त्यांना चकरा माराव्या लागतात. साहेब भेटतीलच, असे नाही. साहेब असले तरी त्यांच्या मागे कामाचा व्याप, मग भेट होत नाही. भेट झाली तरी केवळ काम होऊन जाईल असे आश्‍वासन मिळते. प्रत्यक्षात काम होईलच याची काही शाश्‍वती नसते. कधी एखाद्या व्यक्तिचे काम दुसर्‍या कार्यालयाशी संबंधीत असते, पण तो चकरा मारतो उपविभागीय कार्यालयात. व्यवस्थित मार्गदर्शन नसल्यामुळे त्या व्यक्तिचा वेळ आणि श्रम वाया जाते. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी काढला आहे. खडसे यांनी आपल्या एका मित्राच्या सहकार्याने ह्यव्हिजिटिंग मॅनेजमेंट सिस्टिमह्णही कार्यप्रणाली आपल्या कार्यालयात लावली आहे. या सिस्टिममध्ये त्यांच्या कार्यालयात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची ऑनलाईल नोंद तसेच छायाचित्र घेतले जाईल. त्यांच्या कामाची त्यांना पावती दिली जाणार आहे. काम किती दिवसात होईल याची माहिती एसएमएस वर संबंधित व्यक्तीला कळविली जाईल. चुकून दुसर्‍या कार्यालयातील काम घेऊन आलेल्या व्यक्तिला त्यांचे काम कोणत्या कार्यालयातील आहे, याची देखील माहिती एसएमएसवर कळविली जाईल. या सर्व बाबी उपविभागीय अधिकार्‍यांच्या संगणकाशी जुळलेले राहणार आहे. याशिवाय आवक-जावक विभाग देखील ऑनलाईन करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांचा चकरा मारण्याचा त्रास कमी होण्यास मदत होईल. व्हिजिटिंग मॅनेजमेंट सिस्टिम ही अतिशय उपयुक्त आहे. या सिस्टिममुळे लोकांचा त्रास वाचणार आहे. त्यांना वारंवार कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. सोबतच कामाची माहिती एसएमएसवर मिळाल्यामुळे त्यांना आपले काम कधी होईल याची चिंता करीत बसावे लागणार नाही. ही प्रणाली निश्‍चितच सर्वांसाठी उपयोगी ठरेल, असा विश्‍वास उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी व्यक्त केला.