शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात विक्रमी फळलागवड

By admin | Updated: June 8, 2017 02:42 IST

शासनाने २०१७ - १८ या वर्षासाठी तब्बल ३५ हजार हेक्टर जमिनीवर फळ लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे

नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोकणामध्ये फळ लागवडीसाठी मोठी संधी आहे. यामुळे शासनाने २०१७ - १८ या वर्षासाठी तब्बल ३५ हजार हेक्टर जमिनीवर फळ लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. पुढील तीन वर्षांमध्ये तब्बल ५२६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेतकरी, कृषी विद्यापीठ, कृषी, महसूल व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात येत आहे. कोकण महसूल आयुक्तालय क्षेत्रामधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये फळ बागायतीसाठी प्रचंड संधी आहे. आयुक्तालय क्षेत्रामध्ये तब्बल ११ लाख हेक्टर पडीक जमीन आहे. या जमिनीचा योग्य वापर केल्यास तेथे विविध फळझाडांची लागवड करणे शक्य आहे. सद्यस्थितीमध्ये या परिसरामध्ये १ लाख १२ हजार हेक्टर जमिनीवर आंबा, १ लाख ४८ हजार हेक्टर जमिनीवर काजू, २७ हजार हेक्टर जमिनीवर नारळ, ४ हजार हेक्टर जमिनीवर चिकू व ४९ हजार हेक्टर जमिनीवर इतर फळांची लागवड करण्यात येत आहे. २०१५ - १६ या वर्षामध्ये या विभागात फक्त ५७३ हेक्टर जमिनीवर फळांची लागवड करण्यात आली होती. २०१६ - १७ मध्ये हे प्रमाण ६१०३ हेक्टर झाले आहे. भविष्यातील संधी लक्षात घेवून २०१७ - १८ या वर्षामध्ये ३५ हजार हेक्टर जमिनीवर फळ बागायत करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी तीन वर्षांसाठीचा ५२६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण व तयारी सुरू करण्यात आली आहे. कृषी विभाग व ग्रामपंचायत विभागाकडून लागवडीचे नियोजन करण्यात येत असून कृषी विद्यापीठासोबतच सर्व यंत्रणांना एप्रिल २०१७ पासून प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आले आहे. लागवडीसाठी कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही उद्दिष्ट निश्चित करून देण्यात येत आहे. या मोहिमेसाठी शेतकऱ्यांचीही निवड केली असून त्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. फळबागेसाठी उपयुक्त असे जलकुंड तयार करण्यासाठी कृषी विद्यापीठाने दिलेले मॉडेलचा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये समावेश करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. संपूर्ण देशाला फळांचा पुरवठा करण्याची क्षमता कोकणामध्ये आहे. या परिसरामध्ये असलेल्या जमिनीचा योग्य वापर व शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिल्यास फळ उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होवू शकते. पडीक जमीन लागवडीखाली आणण्याची गरज असून शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्यास कोकणाचा कायापालट होण्याची शक्यता असल्याने कोकण महसूल विभागाच्यावतीने विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. फळलागवडीव्यतीरिक्त कोकणात मसाला पिकांनाही चांगली संधी आहे. परंतु मग्रारोहयो योजनेमध्ये मसाला पिकांचा समावेश नाही. >रोहयोअंतर्गत फळबाग लागवडरोहयोव्यतिरिक्त लागवड१.४० लाख हेक्टररोहयो योजनेत १९९० ते २०१६- १७ पर्यंत लागवड ३.४८ लाख हेक्टरएकूण फळबाग लागवड४.८८ लाख हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र३.३९ लाख हेक्टरमग्रारोहयोअंतर्गत फळबाग लागवडीचा तपशील सन २०१५ - १६ मध्ये विभागात ५७३ हेक्टरवर लागवड२०१६ - १७ मध्ये ६१०३ हेक्टरवर लागवड करण्यात आली. ही राज्यातील फळ लागवडीच्या ३७ टक्के होती. २०१७ - १८ मध्ये ३५००० हेक्टर लागवडीची निश्चिती करण्यात आलीपुढील तीन वर्षांमध्ये ५२६ कोटींची गुंतवणूक अपेक्षित >कोकण विभागाची जमीनधारणाएकूण खातेदार१३.२३ लाख हेक्टरअल्प व अत्यल्प भूधारक ८४ टक्केमोठे भूधारक१६ टक्के