शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात संततधार

By admin | Updated: July 22, 2014 01:00 IST

विदर्भातील दोन जिल्हे वगळता उर्वरित नऊ जिल्ह्यांमध्ये रविवार रात्रीपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी दिवसभरात काही वेळ उसंत घेऊन पाऊस राहून-राहून बरसत होता.

पर्लकोटा नदीला पूर : भामरागडचा संपर्क तुटलानागपूर : विदर्भातील दोन जिल्हे वगळता उर्वरित नऊ जिल्ह्यांमध्ये रविवार रात्रीपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी दिवसभरात काही वेळ उसंत घेऊन पाऊस राहून-राहून बरसत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीला पूर आल्याने ५० गावांचा संपर्क तुटला आहे. अहेरी आगारातून सोडण्यात आलेल्या बसफेऱ्यांनाही फटका बसला. दरम्यान, विदर्भात मान्सून सक्रिय झाल्यामुळे पेरण्यांना जोर आला आहे.अकोला व वाशिम वगळता नागपूर शहरासह ग्रामीण तालुके, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, बुलडाणा आदी जिल्ह्यांमध्ये सर्वत्र सोमवारी दि. २१ जुलै रोजी पाऊस झाला. या पावसामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत नागपूर जिल्ह्यातील ५५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यात २ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, सोयाबीन व तुरीसह विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात २७८ मिमीपेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. शिवाय रविवारी केवळ एका दिवसांत २५ ते ३० मिमी पाऊस झाला आहे. एका वरिष्ठ कृषी अधिकाऱ्याच्या मते, पुढील आठवडाभरात जिल्ह्यातील संपूर्ण पेरणी आटोपण्याची शक्यता आहे. दिवसभर ‘रिपरिप’रविवारी सकाळपासूनच नागपूर व आजूबाजूच्या परिसरात पावसाची रिपरिप सुरू असून सोमवारीदेखील असेच चित्र पाहायला मिळाले. दुपारच्या सुमारास पावसाचा जोरदेखील वाढल्याचे दिसून आले. दिवसभरात शहरात १०.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. वातावरणातील गारवादेखील वाढला होता. दरम्यान, येत्या २४ तासात अशाच प्रकारचे वातावरण राहील व पावसाच्या सरी येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.