शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
2
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
3
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतरचा हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
4
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
5
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
6
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
7
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
8
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
9
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
10
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
11
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
12
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
13
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
14
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
15
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
16
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
17
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
18
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
19
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
20
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : बसफेरी सुरू करण्यासाठी श्रमदानातून रस्ता दुरूस्ती

By admin | Updated: September 22, 2016 10:11 IST

मागील दोन वर्षांपासून रस्त्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या गावातील नागरिकांनी रस्ता दुरूस्तीसाठी श्रमदान केले.

ऑनलाइन लोकमत 
भामरागड, दि. २२ - मागील दोन वर्षांपासून रस्त्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या राजाराम, भामनपल्ली गावातील नागरिकांनी रस्ता दुरूस्ती करून गावात बसफेरी सुरू करावी, यासाठी गुरूवारी पोलिसांच्या सहकार्याने श्रमदान केले  राज्य सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला होता 
गेल्या अनेक वर्षांपासून मóोराजाराम भामनपल्ली रस्ता व पुलाच्या दुरूस्तीबाबत प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु नक्षलवाद्यांच्या भितीपोटी रस्ता दुरूस्तीच्या कामासाठी कोणीही कंत्राटदार पुढे येत नाही, असे कारण देत सरकारने रस्त्याची दुरूस्ती केलेली नाही. यावर तोडगा काढण्याबाबत सरकार गंभीर नसल्याने या भागात रस्त्याचा प्रश्न बिकट झाला आहे. मóोराजाराम, भामनपल्ली परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे बससेवाही बंद झाली आहे. मागील दोन वर्षांपासून खासगी प्रवाशी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी ताडगाव पोलीस मदत केंद्रात येऊन रस्ता दुरूस्ती करून बससेवा सुरू करावी, या मागणीचे निवेदन पोलीस अधिकार्‍यांना सादर केले. यावेळी ताडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी, पोलीस उपनिरिक्षक परजने यांनी हे निवेदन स्वीकारले व या प्रश्नाचा भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप पाटील यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठपुरावा करू, असे आश्‍वासन ग्रामस्थांना दिले होते पोलीस अधीक्षकांनी दखल घेत मóोराजाराम भामनपल्ली परिसरातील नागरिकांची वाहतुकीची अडचण लक्षात घेऊन नागरिकांची सभा बोलावून श्रमदानातून रस्ता दुरूस्ती करून बससेवा सुरू करण्याची सूचना पोलिसांना दिली. 
त्यानंतर ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या अधिकार्‍यांनी मóोराजाराम परिसरातील येचली, भामनपल्ली, मडवेली, मरपल्ली, झिंजगाव, मडवेली, चिचोडा, टोला, इरकडुम्मे, मोकेला, रेला, बोरीया, गोरनूर, पडतमपल्ली, कसनसूर, पल्ली, जुमाबाई, लंकनगुडा, रायगुडा, बासागुडा, गेर्रा, सिपनपल्ली, दुब्बागुड्डा, पल्ली या गावात सभा घेतल्या व आता श्रमदानातून रस्ता दुरस्तीचे काम नागरिक व पोलिस यांनी सुरू केले आहे