महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास बारामतीत विमान अपघातात निधन झालं आहे. या घटनेनं राज्यात शोककळा पसरली असून नेते, कार्यकर्ते धक्क्यात आहेत. अजित पवार यांच्यासह एकूण ६ जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी अजित पवार यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे.
"ही घटना अत्यंत धक्कादायक, वेदनादायी आणि हृदयद्रावक आहे" असं एएनआय (ANI) शी बोलताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या. "राजकीय पातळीवर आमच्यात मतभेद असले तरी आदर कायम होता, आम्ही एकत्र काम केलं आहे. अजित पवार हे कामाप्रती पूर्णपणे समर्पित असलेले नेते होते" अशा शब्दांत त्यांनी पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी प्रियंका यांना अश्रू अनावर झाले.
"जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारं नेतृत्व"
प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, अजित पवार हे अशा व्यक्तिमत्वाचे होते जे आपल्या कामात कधीही तडजोड करत नसत. ते अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत. त्यांचं असं अचानक जाणं सर्वांसाठीच क्लेशदायक आहे. राजकारणापलीकडे जाऊन आज एका माणसाला, एका सहकाऱ्याला आणि एका लोकनेत्याला गमावल्याचं दुःख असल्याचं त्यांनी नमूद केलं.
पवार कुटुंबीयांचं सांत्वन
या कठीण प्रसंगी चतुर्वेदी यांनी पवार कुटुंबाप्रति आपल्या संवेदना व्यक्त केल्या. "मी पवार साहेब, सुप्रिया ताई, सुनेत्रा वहिनी, पार्थ आणि जय यांच्या दुखात सहभागी आहे" असं म्हणाल्या. त्याचबरोबर त्यांनी बारामतीच्या लाखो-करोडो जनतेबद्दलही सहसंवेदना व्यक्त केल्या, ज्यांच्यासाठी अजित पवार केवळ एक नेते नसून कुटुंबातील सदस्य होते. बारामती आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात अजित पवारांचे स्थान अढळ होते.
Web Summary : Priyanka Chaturvedi expressed grief over Ajit Pawar's sudden demise in a plane crash. Despite political differences, she acknowledged his dedication and commitment to work. Chaturvedi conveyed condolences to the Pawar family, recognizing his importance to Maharashtra.
Web Summary : प्रियंका चतुर्वेदी ने विमान दुर्घटना में अजित पवार के निधन पर शोक व्यक्त किया। राजनीतिक मतभेदों के बावजूद, उन्होंने उनके समर्पण और काम के प्रति प्रतिबद्धता को स्वीकार किया। चतुर्वेदी ने पवार परिवार के प्रति संवेदना व्यक्त की, और महाराष्ट्र के लिए उनके महत्व को सराहा।