VIDEO - विहिरीत पडलेल्या कुत्र्याला दिले जीवदान

By Admin | Updated: September 13, 2016 18:08 IST2016-09-13T18:02:19+5:302016-09-13T18:08:27+5:30

विहिरीत पडलेल्या कुत्र्याला जीवदान सोमवारी सकाळी ७ वाजता वन्यजीव संरक्षण व निसर्ग पर्यावरण संस्थेचे एस.बी.रसाळ व त्यांच्या मित्र परिवाराने दिले.

VIDEO - Given to the dog lying in the well | VIDEO - विहिरीत पडलेल्या कुत्र्याला दिले जीवदान

VIDEO - विहिरीत पडलेल्या कुत्र्याला दिले जीवदान

ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. १३ -  जुना अजिसपूर रस्त्यावरील एक पडक्या विहिरीत पडलेल्या कुत्र्याला जीवदान सोमवारी सकाळी ७ वाजता वन्यजीव संरक्षण व निसर्ग पर्यावरण संस्थेचे एस.बी.रसाळ व त्यांच्या मित्र परिवाराने दिले.
 
आरोग्यासाठी अनेक व्यक्ती रोज सकाळी मॉर्निग वॉकसाठी जात असतात. दरम्यान सोमवारी एस.बी.रसाळ, वसंतराव जाधव, गुंडकर, रायपुरे, दसरकर, सिल्लारे, बोडखे हे नेहमीप्रमाणे मॉर्निग वॉकसाठी गेले.  यावेळी त्यांना पडक्या व घाणीने भरलेल्या विहिरीत कुत्रा आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसला. 
 
मात्र विहिरीत गाळ असल्यामुळे त्याला बाहेर निघता येत नव्हते. शेवटी सर्पमित्र रसाळ यांनी दोर आणून त्या कुत्र्याचा गळ्यात अडकविला तसेच त्या कुत्र्याला इजा न होता हळू हळू गाळातून बाहेर काढून जीवनदान दिले. यावेळी उपस्थित मॉर्निग वॉक करणाºया व्यक्तींनी मदत केली.

Web Title: VIDEO - Given to the dog lying in the well