शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : चोरट्यांच्या टार्गेटवर भक्त

By admin | Updated: September 15, 2016 03:36 IST

सिद्धिविनायक मंदिरात केलेली विदेशी फुलांची आरास पाहण्यासाठी मुंबईसह देश-विदेशातून बाप्पाचे भक्त गर्दी करत असल्याच्या बातम्या वाचून आलेल्या महिला चोरांच्या टोळीने भक्तांना टार्गेट केले आहे

मनीषा म्हात्रे ,  मुंबईसिद्धिविनायक मंदिरात केलेली विदेशी फुलांची आरास पाहण्यासाठी मुंबईसह देश-विदेशातून बाप्पाचे भक्त गर्दी करत असल्याच्या बातम्या वाचून आलेल्या महिला चोरांच्या टोळीने भक्तांना टार्गेट केले आहे. दादर पोलिसांनी अटक केलेल्या तीन महिलांच्या चौकशीत ही बाब समोर आली. नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाच्या परिसरातही अशीच परिस्थिती असून चोरीच्या तब्बल ८२ घटनांची नोंद झाल्याने याला आळा कसा घालायचा या विचाराने पोलीस चक्रावले आहे. श्रीलंका, द. आफ्रिका, न्यूझिलंड, बँकॉकमधून सिद्धीविनायकाच्या चरणी विदेशी फुलांची भेट येत आहे. विदेशी फुलांच्या आर्कषक सजावटीच्या बातम्यांमुळे देशभरातील भाविकांनी गर्दी केली आहे. त्याचाच फायदा चोर घेत आहेत. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी दादर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक शांतिलाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दिपाली कुलकर्णी, समशेर तडवी यांचे पथक कार्यरत आहे. पथकातील हवालदार अमोल शेगोकार यांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने संशयितांना हेरुन त्यांच्यावर नजर ठेवली. बुधवारी सापळा रचून यापैकी तीन महिलांना रंगेहाथ अटक करण्यास पथकाला यश आले. अहमदाबाद येथील धनलक्ष्मी परमार (५०), ज्योती परमार (४०) यांच्यासह मथुरातील लाडो रतनसिंग कौर (४२) या तिघांच्या दादर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या तिघीही अभिलेखावरील सराईत आरोपी आहेत. त्यांच्याकडून २५ हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. याच ठिकाणांहून त्यांनी १५०-२०० भाविकांना लुटल्याचा संशय व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)