शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात पांढ-या सोन्याचे उत्पादन घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2016 00:19 IST

कमी पाऊस, बोंडअळी, लाल्याचे आक्रमण.

अकोला, दि. १३ : अगोदरच विदर्भात पांढर्‍या सोन्याचे (कापूस) पेरणी क्षेत्र घटले आहे. त्यात पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने जमीन भेगाळली असून, विविध रोगांसह या पिकावर लाल्याने आक्रमण केले. हा प्रादुर्भाव अधिक वाढल्यास जवळपास ६0 टक्के कापसाचे नुकसान होण्याची शक्यता असते, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. कापूस हे विदर्भाचे नगदी पीक; परंतु उत्पादनावर आधारित दर मिळत नसल्याने अलीकडच्या दहा वर्षांत हे पीक मागे पडले असून, याची जागा सोयाबीनने घेतली आहे. विदर्भात हे पीक १८ ते २0 लाख हेक्टरच्या वर पेरल्या जात होते; परंतु सद्यस्थितीत कापसाची पेरणी केवळ ८ लाख हेक्टरवर झाली आहे. यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या; पण हे पीक वाढीच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारली आहे. सहा आठवडे झाले पाऊस नसल्याने सोयाबीन अनेक ठिकाणी करपले आहे. कापूस पिकावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. या पिकावर बोंडअळी, तुडतुडे व लाल्या या रोगाचा विपरीत परिणाम झाला आहे. जमीन भेगाळल्याने कापसाची पाने लाल होऊन करपत चालली आहेत. -सर्वच पिकांच्या नुकसानाची शक्यता पावसाने दडी मारल्याने मूग, उडिदाचे नुकसान झाले असून, पश्‍चिम विदर्भातील साडेचार हेक्टरवरील तूर पीक धोक्यात आले आहे. यातील काही पिकांचे नुकसानदेखील झाले आहे. सोयाबीन तग धरू न होते; परंतु पाऊसच नसल्याने हजारो हेक्टर पीक करपले आहे.एकतर पाऊस नाही त्यात लाल्या आला आहे. कापूस फुलोर्‍यावर येत असताना लाल पाने झाली, तर उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. यावेळी दुर्लक्ष केल्यास निकृष्ट दर्जाची रुई, बोंडे अपूर्ण उघडतात व बोंडांचे वजन कमी होत असल्याने शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. यामुळे उत्पादनात १0 ते ६0 टक्के एवढी घट आढळून आल्याचा निष्कर्ष वनस्पती रोग शास्त्रज्ञांनी काढलेला आहे. - डॉ. राजेंद्र गाडे, वनस्पती रोग शास्त्रज्ञ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.