शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात वाघ तस्करांची बहेलिया टोळी सक्रिय!

By admin | Updated: January 20, 2015 01:52 IST

राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांत वाघांची शिकार करण्यासाठी मध्य प्रदेशातील बहेलिया टोळी सक्रिय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली़ विशेषत: मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला या टोळीने लक्ष्य केले

गणेश वासनिक - अमरावतीराज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांत वाघांची शिकार करण्यासाठी मध्य प्रदेशातील बहेलिया टोळी सक्रिय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली़ विशेषत: मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला या टोळीने लक्ष्य केले असून, त्यांच्याकडे असलेल्या अत्याधुनिक शस्त्रसाठ्यामुळे वन विभाग हतबल झाल्याचे चित्र आहे. ही टोळी वाघांची शिकार करण्यासाठी घोरपडीची मदत घेत असल्याची धक्कादायक माहिती आहे.व्याघ्रगणना होऊन बराच अवधी लोटला आहे. देशभरात वाघांची आकडेवारी २५ जानेवारीनंतर स्पष्ट होईल. एकीकडे वाघांच्या वाढत्या संख्येविषयी उत्सुकता असताना राज्यात वाघांच्या शिकारीच्या उद्देशाने मध्यप्रदेशातील बहेलिया टोळीने पाय पसरले आहेत. मेळघाटात या टोळीने अत्याधुनिक शस्त्रसाठा, शिकारीचे पाठबळ, संवादासाठी नेटवर्क तसेच वाघांच्या शिकारीसाठी प्रशिक्षित घोरपडसुद्धा सोबत आणल्याची माहिती आहे. पेंच, ताडोबा, नागझिरा, बोर, टिपेश्वर व मेळघाट व्याघ्र प्रकल्पांना या टोळीने लक्ष्य केले असून, वाघांच्या अधिवासाची माहिती घेतली आहे. रामटेक, बऱ्हाणपूर, उमरेड व नागपूर हे या टोळीचे प्रमुख केंद्र असल्याचे वनविभागाला मिळालेल्या माहितीवरुन स्पष्ट झाले़ भुसावळ, नांदेडमार्गे कातड्याची तस्करीडोंगरदऱ्यात अथवा उंच भागात वाघ असल्याची माहिती मिळताच ही टोळी घोरपडीला दोरी बांधून सोडतात. त्यानंतर वाघांच्या वास्तव्याचा शोध घेतला जातो. ठिकाण स्पष्ट झाले, की लोखंडी ट्रॅपने वाघांची शिकार केली जाते. भुसावळ, नांदेडमार्गे रेल्वेने वाघांच्या कातड्याची तस्करी होत असल्याची माहिती आहे.विक्रीचे प्रमुख केंद्र चीनवाघांची शिकार केल्यानंतर ही टोळी कातडे रेल्वेने पाठविते. अलाहाबाद येथे चामडे पाठविण्यासाठी महिलांची मदत घेतली जाते. वाघांच्या कातड्याचा व्यवहार हा अलाहाबाद येथे झाल्यानंतर पुढे हे कातडे चीनमध्ये पाठविले जाते. वाघाच्या कातडीसाठी तस्करांना २५ ते ३० लाख रुपये मिळत असल्याची माहिती आहे.बहेलिया टोळी मेळघाटात दाखल झाली असेल तर ही गंभीर बाब आहे. या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील. प्रसंगी राज्य राखीव दलाची मदत घेतली जाईल.- दिनेश त्यागी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प