शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतून विनापरवाना औषधे परदेशात

By admin | Updated: September 12, 2014 02:37 IST

उमंग फार्माटेक प्रायव्हेट लिमिटेड’ या वसई तालुक्यातील पेल्हार गावातील कंपनीने परवान्याची मुदत संपली असतांना नियम धाब्यावर बसवून औषधनिर्मिती, विक्री व निर्यात केल्याचे स्पष्ट होत आहे.

अजय महाडिक, मुंबई‘उमंग फार्माटेक प्रायव्हेट लिमिटेड’ या वसई तालुक्यातील पेल्हार गावातील कंपनीने परवान्याची मुदत संपली असतांना नियम धाब्यावर बसवून औषधनिर्मिती, विक्री व निर्यात केल्याचे स्पष्ट होत आहे. विनापरवाना औषधनिर्मिती करणे, त्यांची विक्री करणे व त्या रसायनांची निर्यात करणे एफडीए (अन्न व औषध प्रशासन)च्या कायद्याप्रमाणे गंभीर गुन्हा आहे. मात्र याप्रकरणी एफडीए अंधारात असून ‘लोकमत’ने एफडीएचे सहायक आयुक्त गि.खु. वखारिया यांच्याकडे पुरावे सादर केले असता त्यांनी याची गंभिर दखल घेत कंपनीविरोधात गुन्हा दाखल करत असल्याचे सांगितले.‘उमंग फार्माटेक प्रायव्हेट लिमिटेड’ला दिलेले परवाने विशिष्ट कालावधीसाठी असून, त्यात दिलेल्या मार्गदर्शक आराखड्यानुसारच ही निर्मिती करणे अपेक्षित आहे. मात्र, कंपनीने परवान्यातील मार्गदर्शक तत्त्वांनाच फाटा देत औषधनिर्मिती केली आहे. या औषधांच्या खरेदी-विक्री संदर्भात देशी व परदेशी कंपन्यांबरोबर झालेला व्यवहार अ‍ॅक्सिस बॅँकेच्या वसई शाखेतून झाला आहे. या प्रकरणी कंपनीच्या एचआर सुगन्या कृष्णन व कॉलिटी कंट्रोल हेड नागनाथ केसकर यांनी हात वर करत व्यवस्थापनाकडे बोट दाखवले, तर उमंग फार्माटेकचे मालक व व्यवस्थापकीय संचालक राजकुमार बुद्धराज यांना ‘लोकमत’ने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.उमंग फार्माटेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी औषधनिर्मिती व वितरण या क्षेत्रातील कंपनी असून, २००९ ते २०१३ या वर्षांसाठी या कंपनीला मूळ परवाना मिळाला आहे. मात्र या परवान्याची मुदत संपल्यानंतरसुद्धा या कंपनीने आपले उद्योग सुरू ठेवले आहेत.