शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अंडरवर्ल्डचा शार्प शूटर सावंतचा मृत्यू हृदयविकारामुळे

By admin | Updated: July 3, 2016 21:45 IST

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याच्या टोळीतील शार्प शूटर रवींद्र शांताराम सावंत (वय ४४) याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्कयानेच झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. ३ : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याच्या टोळीतील शार्प शूटर रवींद्र शांताराम सावंत (वय ४४) याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्कयानेच झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, सावंतचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह त्याच्या नातेवाईकांना सोपविण्यात आला. तो घेऊन सावंत कुटुंबीय मुंबईला रविवारी दुपारी रवाना झाले.अंडरवर्ल्ड डॉन अश्विन नाईक याच्यावर भर कोर्टात गोळी झाडून त्याच्या हत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी टाडा कायद्यानुसार रवींद्र सावंतला ७ सप्टेंबर १९९६ ला कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

सुरक्षेच्या कारणावरून सावंतला १९ सप्टेंबर १९९६ ला नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. तेव्हापासून अर्थात गेल्या २० वर्षांपासून सावंत मध्यवर्ती कारागृहात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होता. शुक्रवारी रात्री ७ च्या सुमारास सावंतची प्रकृती ढासळल्याने त्याला मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे काही वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर उलटसुलट चर्चेला उधान आले. त्याची माहिती धंतोली पोलीस आणि कारागृह प्रशासनाने सावंतच्या नातेवाईकांना कळविली. त्याचे नातेवाईक मुंबईला जोगेश्वरी (पूर्व) तील एमएचबी कॉलनी, मेघवाडीत राहतात.

ते येथे पोहचले नसल्याने शनिवारी पोलीस आणि डॉक्टरांनी सावंतचे शवविच्छेदन करण्याचे टाळले. रविवारी मनोहर आणि राकेश हे रवींद्रचे दोन मोठे भाऊ काही नातेवाईकांसह नागपुरात पोहचले. त्यानंतर मेडिकलच्या डॉक्टरांनी सावंतचे शवविच्छेदन करून मृतदेह सावंत कुटुंबीयांच्या हवाली केला. यावेळी काही पत्रकारांनी सावंत कुटुंबीयांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला. दुपारी एका अ‍ॅम्बुलन्समधून रवींद्रचा मृतदेह घेऊन सावंत कुटुंबीय मुंबईकडे रवाना झाले. सावंतच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करताना धंतोली पोलिसांनी त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानेच झाल्याचे सांगितले.