शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

मुुंबई पोलिसांच्या रडारवर पुन्हा अंडरवर्ल्ड

By admin | Updated: September 11, 2014 03:27 IST

मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या रडारवर अंडरवर्ल्डला घेतले आहे. अंडरवर्ल्डमधल्या बहुतांश टोळ्यांचे म्होरके परदेशात आहेत

मुंबई : मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या रडारवर अंडरवर्ल्डला घेतले आहे. अंडरवर्ल्डमधल्या बहुतांश टोळ्यांचे म्होरके परदेशात आहेत. मात्र त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिले आहेत.मुंबईत सक्रिय असलेल्या प्रत्येक छोट्यामोठ्या संघटित टोळ्यांचे आत-बाहेर असलेले गँगस्टर, खटल्याच्या तारखांना भाईच्या भेटीसाठी न्यायालयात गर्दी करणारे नंबरकारी, कारागृहांमध्ये डबे आणि अन्य वस्तू घेऊन जाणारे डबेवाले, निरोपे यांच्यासह या टोळीकडे आकृष्ट झालेले तरुण, टोळीकडे झुकलेले व्यावसायिक, उद्योगपती या मोठ्या साखळीमागे मारियांच्या आदेशानंतर पोलिसांचा ससेमिरा लागण्याची दाट शक्यता आहे. यातही खंडणी कोणाकडे मागावी यापासून सुपारी, सेटलमेन्ट, रिअल इस्टेटमधली गुुंतवणूक याबाबत टोळ्यांना माहिती पुरविणारे पोलिसांचे मुख्य लक्ष्य असेल, असे मारियांनी स्पष्ट केले.बिटू सिंगविरोधात रेड कॉर्नरबॉलीवूड निर्माते अली मोरानी यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात नाव पुढे आलेल्या परदेशस्थित इव्हेन्ट मॅनेजर बिटू सिंग याच्या नावे मुंबइ गुन्हे शाखा लवकरच रेड कॉर्नर नोटीस जारी करणार आहे. पोलीस आयुक्त मारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार मोरानी गोळीबार प्रकरणात नाव पुढे आल्यानंतर सिंग यांच्याकडे चौकशी करणे क्रमप्राप्त झाले. मात्र ते परदेशात असल्याने रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात येणार आहे. हॅपी न्यू ईयर या हिंदी चित्रपटाच्या प्रसारण हक्कावरून सिंग आणि मोरानी यांच्यात खटपट झाली. त्यानंतर अंडरवर्ल्डकडून मोरानींच्या निवासस्थानी गोळीबार केला होता. (प्रतिनिधी)