Marathi Reservation: मराठा आरक्षणावर 'आऊट ऑफ द बॉक्स' विचार करावा: उदयनराजेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 20:34 IST2021-02-28T20:31:35+5:302021-02-28T20:34:19+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा (Marathi Reservation) विविध राजकीय पक्षांकडून आणि नेत्यांकडून चर्चिला जात आहे. ०८ मार्च रोजी मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी मराठा आरक्षणासंदर्भात 'आऊट ऑफ द बॉक्स' जाऊन विचार होणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे.

Marathi Reservation: मराठा आरक्षणावर 'आऊट ऑफ द बॉक्स' विचार करावा: उदयनराजेंची मागणी
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा (Marathi Reservation) विविध राजकीय पक्षांकडून आणि नेत्यांकडून चर्चिला जात आहे. ०८ मार्च रोजी मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी मराठा आरक्षणासंदर्भात 'आऊट ऑफ द बॉक्स' जाऊन विचार होणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे. मुंबई येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (udayanraje bhosale reaction on marathi reservation)
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणे सर्वपक्षीयांची जबाबदारी आहे. मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन करण्यात आलेला गायकवाड आयोग हा राजकीय नाही. गायकवाड आयोगानुसार, ७० टक्के मराठा समाज मागास आहे, असे उदयनराजे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सर्व आरोपांवर उत्तरं देण्यास बांधील नाही; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
राज्य सरकारकडे इच्छाशक्तीचा अभाव
मराठा आरक्षण राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आले आहे. असे असतानाही त्याची अंमलबजावणी करणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र, राज्य सरकारकडे एकूणच इच्छाशक्तीचा अभाव आहे. मराठा आरक्षणाबाबत आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करावा लागले. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने श्वेत पत्रिका काढावी. त्यामुळे राज्यातील जनतेला सत्य परिस्थिती समजेल, असेही उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
देशाचा नागरिक म्हणून मत मांडतोय
छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभावाची शिकवण स्मरणात ठेवायला हवी. कोणता एक बडा नेता किंवा मोठा माणूस म्हणून नाही, तर देशाचा एक नागरिक म्हणून मत व्यक्त करतोय, असेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.
शिवसेना खून, बलात्कार करणाऱ्यांना पाठिशी घालतेय; नारायण राणेंचा आरोप
तेव्हा न्यायालयाचा अवमान झाला नाही
मराठा आरक्षणासंदर्भात काही करायचे म्हटले तर तो न्यायालयाचा अवमान ठरतो, असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. मात्र, डान्सबार प्रकरणी तीनवेळा न्यायालयाचा अवमान झाला, तेव्हा काही झाले नाही. दुसरीकडे सारथीसारख्या संस्था बंद होण्याच्या मार्गावर आहेत, असेही उदयनराजे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी गेल्या काही दिवसांपासून अनेक नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही उदयनराजे मराठा आरक्षणासंदर्भात भेटले होते.