टी.वाय.बी.कॉमचा निकाल पुढील आठवडय़ात

By Admin | Updated: June 21, 2014 01:39 IST2014-06-21T01:39:52+5:302014-06-21T01:39:52+5:30

टीवाबीकॉम सेमिस्टर सहा परीक्षेचा निकाल पुढील आठवडय़ात जाहीर करण्यात येणार असल्याचे, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी सांगितले.

TYB.com results in next week | टी.वाय.बी.कॉमचा निकाल पुढील आठवडय़ात

टी.वाय.बी.कॉमचा निकाल पुढील आठवडय़ात

>मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत क्रेडिट अॅण्ड ग्रेड पद्धतीनुसार घेण्यात आलेल्या टीवाबीकॉम सेमिस्टर सहा परीक्षेचा निकाल पुढील आठवडय़ात जाहीर करण्यात येणार असल्याचे, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले होते. यामुळे टीवायबीकॉमचे अनेक पेपर पुढे ढकल्यात आले होते. परीक्षा लांबल्याने विद्यापीठाच्या निकालाला विलंब होत आहे. यामुळे लाखो विद्याथ्र्याचे भवितव्य टांगणीला लागले आहे. टीवायबीकॉमच्या परीक्षेला विद्यापीठातून सर्वाधिक म्हणजे 65 हजार विद्यार्थी बसले आहेत. या विद्याथ्र्याचे निकाल रखडल्याने त्यांना पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविणो जिकरीचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे टीवायबीकॉमचा अखेरचा पेपर 10 मे रोजी झाला. परीक्षा होऊन 40 दिवसांपेक्षा अधिक दिवस झाले असतानाही विद्यापीठाने टीवायबीकॉमचा निकाल जाहीर केलेला नाही.
टीवायबीकॉमचे निकाल पुढील आठवडय़ात बुधवार्पयत जाहीर करण्यात येतील, असे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी सांगितले. दरम्यान, विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने भोंडे यांना निवेदन देऊन दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: TYB.com results in next week