शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

दोन जागा भाजपा, एक राष्ट्रवादीकडे

By admin | Updated: June 25, 2014 01:08 IST

विधान परिषदेच्या नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात भाजपाचे अनिल सोले विजयी झाले असून त्यांनी काँग्रेसचे डॉ. बबनराव तायवाडे यांना पराभूत केले.

मुंबई : मुंबई : विधान परिषदेच्या नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात भाजपाचे अनिल  सोले विजयी झाले असून त्यांनी काँग्रेसचे डॉ. बबनराव तायवाडे यांना पराभूत केले. तर पुणो मतदारसंघात भाजपाचेच चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत. औरंगाबाद मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश चव्हाण यांनी भाजपाचे शिरीष बोराळकर यांचा 15 हजार मतांनी पराभव करत आपली जागा कायम राखली. पुणो शिक्षक मतदारसंघात अपक्ष दत्ता सावंत, तर अमरावती मतदारसंघातून शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे आघाडीवर आहेत.
या निवडणुकीत नागपूर पदवीधर मतदारसंघ वगळता पहिल्या पसंती क्रमांकाची मते कोणालाच न मिळाल्याने दुस:या पसंतीची मते मोजण्याचे काम रात्री उशीरापयर्ंत सुरू होते.
भाजपाने गड राखला
नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी जिंकून भाजपचे अनिल  सोले यांनी ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा गड कायम राखला. पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण करीत सोले यांनी काँग्रेसचे डॉ. बबनराव तायवाडे यांना तब्बल 31 हजार 259 मतांनी पराभूत केले. पहिल्यांदाच राजकारणात उतरलेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी तायवाडेंच्या मागोमाग मते घेत राजकीय वतरुळाचे लक्ष वेधून घेतले. 
पाटील, सावंत आघाडीवर 
विधान परिषदेच्या पुणो पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत चंद्रकांत पाटील व दत्ता सावंत यांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत चंद्रकांत पाटील यांनी नजिकचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार सारंग पाटील यांच्यावर 7 हजार 716 मतांनी आघाडी घेतली. चंद्रकांत पाटील यांनी 51 हजार 711 मते मिळाली. तर सारंग पाटील यांना 44 हजार 777 मते मिळाली. राष्ट्रवादीचे बंडखोर अरुण लाड यांना 32 हजार 876 मते मिळाली. 
औरंगाबादमध्ये चव्हाण विजयी
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा 15 हजार मतांच्या फरकाने पराभव केला. चव्हाण यांना 68 हजार 785 ,तर बोराळकर यांना 53 हजार 643 मते मिळाली.
पुणो शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार दत्ता सावंत यांना दुस:या फेरीअखेर 8 हजार 842, तर साळुंके यांना 6 हजार 5क्3 , राजमाने यांना 6 हजार 3क्क् मते मिळाली. 
अमरावती शिक्षक मतदारसंघात निवडणूक रिंगणात असलेल्या 17 उमेदवांरापैकी एकाही उमेदवाराने पहिल्या फेरीत 13,क्62 मतांचा कोटा पूर्ण केला नाही. परिणामी दुस:या पसंतीच्या क्रमांकासाठी मतमोजणी करण्यात आली. तेराव्या फेरीअखेर शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांनी 1क् हजार 145 मते प्राप्त करून मतांची आघाडी कायम ठेवली. तर अपक्ष अरुण शेळके दुस:या क्रमांकावर आहेत. (प्रतिनिधी)