शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित

By admin | Updated: December 19, 2014 02:42 IST

राज्यात इतर मागासवर्गिय, अनुसूचित जाती, विमुक्त जाती अन् भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्गिय प्रवर्गातील १ लाख

नागपूर : राज्यात इतर मागासवर्गिय, अनुसूचित जाती, विमुक्त जाती अन् भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्गिय प्रवर्गातील १ लाख ९५ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित असल्याची माहिती राज्य शासनाने दिली आहे. यासंदर्भात दिप्ती चवधरी, रामहरी रुपनवर इत्यादी सदस्यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावर लेखी उत्तरात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी ही माहिती दिली.२०१३-१४ वर्षाअखेर प्रलंबित असलेल्या ७ लाख ३८ हजार अर्जांपैकी या आर्थिक वर्षात ५ लाख ४३ हजार अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. प्रलंबित अर्ज निकाली काढण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत असे लेखी उत्तरात नमूद करण्यात आले.आश्रमशाळांतील शिक्षकांना १ तारखेलाच वेतन मिळणारराज्यातील आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन १ तारखेपासूनच होईल अशी माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिली. या शिक्षकांना नियमित वेतन मिळण्याबाबत रामनाथ मोते, डॉ.अपूर्व हिरे, नागो गाणार यांनी तारांकित प्रश्न मांडला होता.या शिक्षकांना विलंबाने वेतन मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत. जुलै २०१४ पासून संगणक प्रणालीद्वारे वेतन अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. ही आॅनलाईन प्रक्रिया नव्याने सुरू झाली असल्यामुळे तसेच दुर्गम भागात इंटरनेट उपलब्ध होत ़नसल्याने काही प्रकल्पात नियमित वेतन देण्यास विलंब झाल्याचे त्यांनी मान्य केले. आता मात्र यात सुधारणा झाल्या असून १ तारखेलाच वेतन होईल. जर अधिकाऱ्यांनी यासंदर्भात हलगर्जीपणा केली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेदेखील सावरा यांनी स्पष्ट केले.जात पडताळणी कार्यालयातील रिक्त पदे भरणाररत्नागिरी येथील जात पडताळणी कार्यालयातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात येतील असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. यासंदर्भात विजय गिरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.रत्नागिरी येथील जात पडताळणी समितीच्या कार्यालयात आॅक्टोबर २०१४ अखेरीस २ हजार ४८९ प्रकरणे प्रलंबित होती. या कार्यालयात असलेल्या रिक्त पदांमुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत आहे. येथील १९ मंजूर पदांपैकी ११ पदे रिक्त असून लवकरात लवकर ही पदे भरण्यात येतील असे आश्वासन बडोले यांनी दिले.अपंगत्वाचे दाखले जलदगतीने देण्याचे निर्देशराज्यात अपंगत्वाचे दाखले जलदगतीने देण्याबाबत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व वैद्यकीय अधिष्ठाता यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आली. यासंदर्भात संदिप बाजोरिया, नरेंद्र पाटील, विद्या चव्हाण इत्यादींनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर लेखी उत्तरादरम्यान सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी ही माहिती दिली.राज्यात संगणकीय प्रणाली सुरू होण्यापूर्वी १५ लाख ६९ हजार ५८२ पैकी ७ लाख ३३ हजार ८४५ अपंगांना दाखले देण्यात आले होते. परंतु संगणकीय प्रणाली सुरू झाल्यापासून १ लाख २७ हजार ९९७ जणांना दाखले देण्यात आले. तर २५ हजार ८८२ अर्ज फेटाळण्यात आले अशी माहिती या लेखी उत्तरात नमूद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)