शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन डोकी उडवली, आता गोदावरीत डुबकी मारतो!

By admin | Updated: September 27, 2015 05:52 IST

ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित ‘सनातन’ संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याच्या मोबाइल संभाषणामध्ये ‘दोन डोकी उडविली आहेत,’

कोल्हापूर : ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित ‘सनातन’ संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याच्या मोबाइल संभाषणामध्ये ‘दोन डोकी उडविली आहेत,’ असे याआधी पुढे आले होते. ‘आता नाशिकमधील कुंभमेळ्यात गोदावरी नदीमध्ये दोन डुबक्या मारून येतो,’ असेही तो मित्र सुमित खामकर याच्याशी बोलल्याचे मोबाइल संभाषणावरून स्पष्ट झाले आहे. या दोन्ही संभाषणांचा संदर्भ पानसरे हत्येच्या घटनेशी आहे. त्याचा तपास होणे आवश्यक आहे, असा यक्तिवाद सरकारी वकिलांनी शनिवारी केला. समीर याच्या कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले. पोलिसांनी १६४ साक्षीदारांकडे चौकशी केली; त्यामध्ये पनवेल येथे आश्रमात राहणारे अजयकुमार प्रजापिता यांच्याकडून मोबाइल दुरुस्तीसाठी आणल्याचे समीरने सांगितले. त्यानुसार पोलीस अजयकुमार यांच्या शोधात आहेत. फोंडा-गोवा येथे राहणारी मैत्रीण श्रद्धा पोवार व मित्र सुमित खामकर या दोघांबरोबर पानसरे हत्येसंदर्भातील मोबाइल संभाषण प्राप्त झाले आहे. त्यांच्यापर्यंत अद्याप पोलीस पोहोचलेले नाहीत, असे यावेळी तपास अधिकारी चैतन्या यांनी सांगितले.समीरकडून मोबाईलची ३१ सीमकार्ड जप्त केली आहेत. त्यावरून त्याने कोणाशी आणि कधी संपर्क साधला, त्याबद्दल तपास करायचा आहे; त्यामुळे गायकवाड याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी बाजू सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी मांडली. संशयित गायकवाड याच्या वतीने सांगली येथील अ‍ॅड. एम. एम. सुहासे आपल्या युक्तिवादात म्हणाले, समीरच्या आवाजाचे नमुने जुळले म्हणजे त्यानेच खून केला आहे, असे नाही. ज्या कारणासाठी पोलिसांनी कोठडी वाढवून घेतली त्याचा तपासच पोलिसांनी केलेला नाही. रुद्र आणि समीरचा काहीही संबध नाही. २३ मोबाईल आणि ३१ सीमकार्ड मिळाली आहेत. मग पुन्हा कोठडी कशाला हवी आहे, अशी विचारणही त्यांनी केली. दोन्ही बाजंूचा युक्तिवाद ऐकून प्रथम वर्ग न्यायाधीश वैशाली व्ही. पाटील यांनी सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यावेळी न्यायालय परिसरात प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. (प्रतिनिधी)