शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

तिढा सुटणार दोन दिवसांत

By admin | Updated: September 12, 2014 02:17 IST

महायुतीच्या जागावाटपाबाबत शिवसेना आणि भाजपा या दोन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी घटकपक्षांबरोबर स्वतंत्रपणे चर्चा करूनही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही.

संदीप प्रधान, मुंबईमहायुतीच्या जागावाटपाबाबत शिवसेना आणि भाजपा या दोन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी घटकपक्षांबरोबर स्वतंत्रपणे चर्चा करूनही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. पण आता येत्या दोन दिवसांत एका टेबलवर सर्वांनी बसून चहा-नाश्त्यासह चर्चेला सुरुवात करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्रीवरील बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.महायुतीमधील जागावाटप निश्चित होत नसतानाच शिवसेनेला १५३ व भाजपाला मित्रपक्षांसह १३५ जागा सोडण्याचा फॉर्म्युला मातोश्रीकडून पुढे केला गेल्याने मित्रपक्षांमध्ये अस्वस्थतता पसरली आहे. रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकर यांची राष्ट्रीय समाज पार्टी व विनायक मेटे यांचा शिवसंग्राम यांनी भरमसाठ जागांची मागणी केली आहे. भाजपाला आपल्या कोट्यातून या जागा द्यायच्या झाल्या तर १६ ते १८ जागांपेक्षा अधिक जागा देण्याची त्यांची तयारी नाही. आतापर्यंत शिवसेनेकडून आमदार दिवाकर रावते हे स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्षाबरोबर बोलत होते तर खासदार संजय राऊत यांना रिपाइंशी वाटाघाटी करण्यास सांगितले होते. भाजपामध्ये प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे मित्रपक्षांबरोबर चर्चा करीत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्षाला शिवसेना-भाजपाकडून हव्या असलेल्या बहुतांश जागा पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने त्यांच्यासोबतची चर्चा लवकर संपली. मात्र रिपाइंकडून मुंबई व मराठवाड्यातील जागांची मागणी केली जात असल्याने त्यांच्यासमवेतची चर्चा फलद्रुप झालेली नाही. त्यामुळेच रामदास आठवले दररोज इशारे देत आहेत. गुरुवारी आठवले हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. परंतु आता त्यांना शुक्रवारी भेटीचे आश्वासन मिळाले आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्याने त्याच मागणीकरिता लढणाऱ्या शिवसंग्रामला शिवसेना-भाजपा धूप घालत नाही. नाममात्र जागांवर त्यांची बोळवण करण्याचा दोन्ही पक्षांचा इरादा आहे. या पार्श्वभूमीवर आता स्वतंत्रपणे चर्चा करीत न बसता एकत्र बसून चर्चा करण्याचे ठाकरे-फडणवीस भेटीत ठरले. निवडणूक तारखांची घोषणा अजून झालेली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाचे चित्र अद्याप धूसरच आहे आणि वाटाघाटींवर पितृपक्षाचे सावट आहे. त्यामुळे महायुतीच्या टेबलावरील चर्चेच्या आणखी काही फेऱ्या होतील, यथेच्छ चहा-फराळाचा आस्वाद महायुतीचे नेते घेतील आणि त्यानंतरच जागावाटपाचा तिढा सुटेल, असे बोलले जात आहे.