समाजाला तुकारामांच्या शिकवणीची गरज

By Admin | Updated: July 10, 2014 00:42 IST2014-07-10T00:42:39+5:302014-07-10T00:42:39+5:30

संत तुकाराम महाराज यांचे समाजात योगदान मोठे आहे. जात, धर्म, वर्ण यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाजाला माणुसकीची शिकवण दिली.

Tukaram's teaching needs the community | समाजाला तुकारामांच्या शिकवणीची गरज

समाजाला तुकारामांच्या शिकवणीची गरज

मुंबई : संत तुकाराम महाराज यांचे समाजात योगदान मोठे आहे. जात, धर्म, वर्ण यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाजाला माणुसकीची शिकवण दिली. माणसामाणसातील दुफळी दूर करण्याचाही प्रयत्न केला. मात्र आज समाज जात, धर्म, वर्ण या चक्रव्यूहात अडकला आहे, अशी खंत व्यक्त करीत आज समाजाला संत तुकाराम महाराजांच्या शिकवणुकीची गरज भासू लागली आहे, असे मत साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, इंडिया या संस्थेच्या वतीने ‘तुकारामांची गाथा’चे ब्रेल लिपीत रूपांतर केले. या ग्रंथाचे प्रकाशन अच्युत गोडबोले यांच्या हस्ते केले, त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकत्र्या साधना वङो, नॅबचे मानद सचिव के. रामकृष्ण आणि के. रमणशंकर उपस्थित होते.
नॅबचा हा उपक्रम स्तुत्य आहे. पाठय़पुस्तकाव्यतिरिक्त इतर क्षेत्रंतील पुस्तके प्रकाशित करून त्यांनी आपल्या सीमा विस्तारल्या आहेत, या शब्दांत गोडबोले यांनी नॅबचे कौतुक केले. तर मी ब्रेल लिपी शिकले आह़े त्यामुळे नॅब या माध्यमातून मोठे काम करीत आहे. त्यामध्ये माझा खारीचा वाटा आहे, अशा भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या साधना वङो यांनी व्यक्त केल्या. या ग्रंथाच्या एकूण 1क् प्रतींसाठी आणि कार्यक्रमासाठी वङो यांनी आर्थिक साहाय्य केले आहे.
नॅब संस्थने दृष्टिहीन व्यक्तींना अवांतर वाचनाकरिता आध्यात्मिक साहित्याचे ब्रेल लिपीत रूपांतर करते. त्यात भगवद्गीता, बायबल, कुराण, ज्ञानेश्वरी, दासबोध आदी ग्रंथांचे ब्रेलमध्ये रूपांतर केले आहे. शिवाय लवकरच ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ हिंदी ब्रेल लिपीत प्रकाशित करण्याचा नॅबचा मानस आहे, असे के. रमणशंकर यांनी याप्रसंगी सांगितले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Tukaram's teaching needs the community