पुलावरुन ट्रक कोसळला; एक ठार, दोन जखमी

By Admin | Updated: June 5, 2015 23:47 IST2015-06-05T23:47:20+5:302015-06-05T23:47:20+5:30

अकोला जिल्हात मन नदीवर झाली दुर्घटना.

Truck collapses; One killed, two injured | पुलावरुन ट्रक कोसळला; एक ठार, दोन जखमी

पुलावरुन ट्रक कोसळला; एक ठार, दोन जखमी

लोहारा (जि. अकोला) : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या लोहारा येथील नदीवरील पुलावरून मिनी ट्रक कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या दुर्घटनेत महेंद्र पांडुरंग मोरे (२0) या युवकाचा मृत्यू झाला, तर महादेव हिंमत तायडे आणि प्रवीण सुरेश मोरे हे जखमी झाले. लोहारा येथून एमएच-0५-सीए-७५४३ क्रमांकाचा मिनी ट्रक रेती घेऊन शेगावकडे निघाला होता. दुपारी १0.३0 वाजताच्या सुमारास मिनी ट्रक पुलावरून जात असताना एका वाहनाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. तेवढय़ात विरुद्ध दिशेने एसटी बस आली. परिणामी मिनी ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक पुलावरून नदीपात्रात कोसळला. नदीत पाणी नव्हते. या घटनेत महेंद्र पांडुरंग मोरे या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी महादेव हिंमत तायडे आणि प्रवीण सुरेश मोरे यांना प्रथम शेगाव येथील सई मोटे उपजिल्हा रुग्णलयात भरती करण्यात आले; मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. *ग्रामस्थांचा पुढाकार मिनी ट्रक पुलावरून कोसळल्याचे नदीपात्रातून रेती भरणार्‍या मजुरांना दिसले. मजुरांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मजुरांच्या साहाय्याने जखमींना तातडीने रुग्णालयात भरती केले. *उरळ पोलीस मात्र अनभिज्ञ ट्रक पुलावरून कोसळल्याची घटना दुपारी ११.३0 वाजताच्या सुमारास घडली. लोहारा ते उरळ हे अंतर आठ कि.मी. आहे. दुर्घटना घडल्याची माहिती जिलत वार्‍यासारखी पसरली; मात्र त्याबाबत उरळ पोलिसांना दुपारी ३.४५ पर्यंत माहिती नव्हती.

Web Title: Truck collapses; One killed, two injured