शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरमध्ये गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली

By admin | Updated: June 3, 2014 22:14 IST

गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनाने पूर्ण देशात निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीसव प्रदीप गारटकर यांनी मुंडे यांना श्रद्धांजली वाहताना येथे व्यक्त केली.

इंदापूर : महाराष्ट्राचा झंझावात शमल्याची भावना लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनाने पूर्ण देशात निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीसव प्रदीप गारटकर यांनी मुंडे यांना श्रद्धांजली वाहताना येथे व्यक्त केली.गोपीनाथ मुुंडे यांच्या आकस्मिक निधनाने आज सर्वसामान्य इंदापूरकर हेलावून गेला होता. सन १९९०नंतर उत्तरोत्तर इंदापूरकरांशी असणारे नाते दृढ करणारे मुंडे अचानक जगाचा निरोप घेतील, याची इतरांप्रमाणे इंदापूरकरांनीदेखील कल्पना केली नव्हती. सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन नगर परिषदेच्या पटांगणात करण्यात आले आहे, एवढा मोबाईलवरचा एक निरोप या सर्वांना एकत्र घेऊन आला.या वेळी गारटकर म्हणाले, 'मुंडेंनी ग्रामीण भागात भाजप रुजवला. सामान्यांच्या सुखदु:खांत सहभागी होणारा हा लोकनेता होता. १५ वर्षांच्या अथक संघर्षानंतर दिल्ली ग्रामविकास खात्याचे मंत्रिपद मिळाले. या संधीचे मुंडे सोने करतील, असा विश्वास सर्वसामान्यांना होता. मात्र, देवाला ते मंजूर नव्हते. एका क्षणात सत्काराच्या समारंभाऐवजी पार्थिव देहाचे दर्शन नशिबात आले आहे.'भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष माऊली चवरे यांनी, संघर्षमय जीवन जगणारा, इतरांना जगण्याची ताकद देणारा बुलंद आवाज हरपला, अशी श्रद्धांजली वाहिली.प्रा. कृष्णा ताटे म्हणाले, 'शतकानंतर एखादे संघर्षशील नेतृत्व, सामन्यांच्या हिताला प्राधान्य देणारे व्यक्तिमत्त्व निर्माण होते. त्यांचे कार्य पुढे चालविणे हीच आदरांजली ठरेल.'संघर्ष करणार्‍याला पाठबळ देणारे, प्रस्थापितांना आव्हान देणारे, कार्यकर्त्यांची पारख असणारे व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे, असे समाजवादी कार्यकर्ते सलीम शेख म्हणाले.या वेळी माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर मखरे, अप्पासाहेब जगदाळे, विशाल बोंद्रे, धनंजय बाब्रस, किरण गोफणे, बाबासाहेब चवरे, अमोल मिसाळ, गोरख शिंदे, युवराज पोळ, डॉ. शशिकांत तरंगे, विठ्ठल ननवरे, नीलेश देवकर व इतरांनी श्रद्धांजलिपर भाषणे केली. शिवाजी मखरे यांनी या सभेचे प्रास्ताविक केले.आजच्या दिवसाची सुरुवात झाली तीच मुळी उदास पावसाळी वातावरणात... सकाळी सहा-साडेसहालाच आभाळ दाटून आले.... रपरप पाऊस कोसळला. तो कोसळण्याआधी व नंतरदेखील वातावरणातील उदासी, थेंबांचा चुटपुटता गहिवर तसाच होता.. वीजपुरवठा खंडित झाला होता. टीव्ही संच बंद असल्याने मिळालेल्या अशुभ बातमीची कुणाला खातरजमा करता आली नाही. अकरा वाजण्याआधी वीज आली अन् लोक टीव्हीशी जखडले गेले.