शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नागझिऱ्यातून दोन वर्षांत चार वाघांचे स्थलांतर

By admin | Updated: December 30, 2014 01:33 IST

नागझिरा अभयारण्यात शिकाऱ्यांचा झालेला शिरकाव, मानवांचा हस्तक्षेप तसेच पुरेशे अन्न उपलब्ध नसल्यामुळे मागील दोन वर्षांत नागझिरातील चार वाघ इतरत्र स्थलांतरित झाले

नरेश रहिले- गोंदियानागझिरा अभयारण्यात शिकाऱ्यांचा झालेला शिरकाव, मानवांचा हस्तक्षेप तसेच पुरेशे अन्न उपलब्ध नसल्यामुळे मागील दोन वर्षांत नागझिरातील चार वाघ इतरत्र स्थलांतरित झाले असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे नागझिरा अभयारण्यातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे़ सन २०१३च्या फेब्रुवारीमध्ये नागझिरा अभयारण्यातील ‘अयात’ नावाचा वाघ वाराशिवनीच्या पेंच प्रकल्पाच्या जंगलात निघून गेला. त्यानंतर आॅगस्ट २०१३मध्ये ‘जय’ नावाचा वाघ उमरेडच्या करंडला येथे निघून गेला, तर २०१४मध्ये ‘प्रिंस’ नावाचा वाघ पेंच येथे निघून गेला. यापाठोपाठ २१ नोव्हेंबर रोजी ‘अल्फा’ या वाघिणीच्या पोटी जन्मलेली ‘कॉनी’ ही वाघीण नागझिरातून निघून गेली. तिची शोधमोहीम मागील दीड महिन्यापासून सुरू होती. ‘कॉनी’चा ठावठिकाणा शोधण्यासाठी नागझिरा, नवेगाव व कोका परिसरातील ट्रॅपिंग कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी नजर ठेवून होते. अखेर ती नवेगाव अभयारण्यात आढळली. ३ डिसेंबर रोजी ‘कॉनी’ नवेगाव येथील बोंडे रेंजमधील कॅमेऱ्यात कैद झाली. नागझिरानंतर पूर्वेकडील भाग शेंडा, कोयलारी व डोंगरगाव परिसरात काही दिवस घालवून ती डिसेंबरमध्ये नवेगाव अभयारण्यात पोहोचली. नागझिरा ते नवेगाव या प्रवासात या वाघिणीने ६९ किलोमीटरचे अंतर पार केले.नागझिरा अभयारण्यात प्राण्यांना पुरेसे खाद्य मिळत नसल्याने ते इतरत्र स्थलांतर करीत असल्याची शक्यता वन्यजीवप्रेमी व्यक्त करीत आहेत. सोबती शोधण्यास किंवा आपले क्षेत्र ठरविण्यास वाघ बहुधा बाहेर जातात, असे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. टोळी मागावरचनागझिरा अभयारण्यात वाघांची शिकार करणारी टोळी सक्रिय असल्याची विश्वसनीय माहिती आहे. बहेलिया समाजातील लोक वाघांची शिकार करून त्यांच्या कातड्याची तस्करी करतात. वनाधिकाऱ्यांनी या टोळीचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा वन्यजीवप्रेमी करीत आहेत.वाघांचे हे स्थलांतर एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. नागझिरा अभयारण्यात वाघांच्या संवर्धनासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. मात्र ‘कॉनी’ही नवेगाव येथे गेल्यामुळे तेथेही वाघांचे संवर्धन होईल. - अशोक खुणे, सहायक वनसंरक्षक, नागझिराफक्त नागझिरा अभयारण्यातीलच वाघ का निघून जातात याचा वनाधिकाऱ्यांसाठी शोध घेतला पाहिजे. वाघाचे संवर्धन होईल, यासाठी वन विभागाने पाऊल उचलण्याची गरज आहे. - सावन बहेकार, मानद वन्यजीव रक्षक, गोंदिया