शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! वाचा कोणाची कुठे झाली बदली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 23:44 IST

राज्य सरकारने राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

राज्य सरकारने २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. याबाबत आदेश जारी केला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आणि सोलापूर यांसारख्या शहरांतील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांचा समावेश आहे.   

या फेरबदलात अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत, तर काही महापालिकांच्या आयुक्तपदी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   

या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या

१) जी. श्रीकांत : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत असलेले जी. श्रीकांत यांची आता नवी मुंबईतील जल जीवन मिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

२) दिलीप स्वामी : छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची बदली अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी झाली आहे.

३) वर्षा ठाकूर-घुगे - लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची मुंबईतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.   

४) दीपक सिंगला - पीएमआरडीए, पुणे येथील अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांची नागपूर येथील मनरेगा आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे.

५) के. मंजुलक्ष्मी : कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची पुणे येथील पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

६) डॉ. राजेंद्र भारूड - मुंबईतील उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रकल्प संचालक डॉ. राजेंद्र भारूड यांची कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे.

७) डॉ. प्रवीणकुमार देवरे - पुण्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची बुलढाणा जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.

८) डॉ. भरत बास्टेवाड - नागपूर येथील मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड यांची लातूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

९) वर्षा लड्डा - पुणे येथील कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या वर्षा लड्डा यांची अमरावती महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

१०) अमोल येडगे - कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्त पदी बदली झाली आहे.

११) डॉ. विजय राठोड - एमआयडीसी, मुंबईचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांची कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

१२) विनय गौडा जी.सी. - चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची आता छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.

१३) डॉ. किरण पाटील - बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

१४) डॉ. मंगेश गोंदावले - एमआयडीसी, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांची गोंदियाच्या जिल्हाधिकारी पदी बदली झाली आहे.

१५) कुमार आशीर्वाद - सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरच्या जिल्हाधिकारी पदी वर्णी लागली आहे.

१६) वसुमना पंत - नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

१७) प्रजित नायर - गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी बदली झाली आहे.

१८) अंकित - छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

१९) कार्तिकेयन एस. - कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.

२०) संजीता महापात्रा - अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्रा यांची सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

२१) मिन्नू पी. एम. - जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे.

२२) सत्यम गांधी - सांगली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

२३) जस्मिन - रत्नागिरीतील राजापूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी जस्मिन यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे.

२४) अंजली शर्मा - अंजली शर्मा यांची जालना महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

२५) कृष्णकांत कनवारिया - नंदुरबारमधील शहाद्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कनवारिया यांची जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Major IAS Transfers in Maharashtra: 25 Officers Shifted!

Web Summary : Maharashtra government transfers 25 IAS officers, impacting key cities. Collectors and municipal commissioners of Chhatrapati Sambhajinagar, Kolhapur, Nagpur, Solapur are among those transferred, with many districts getting new leadership.
टॅग्स :GovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र