शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकर खुनप्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतर

By admin | Updated: June 3, 2014 21:58 IST

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार डॉ. नरेंद्र दाभोलकर खुन प्रकरणाचा तपास आज सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आला.

पुणे : उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार डॉ. नरेंद्र दाभोलकर खुन प्रकरणाचा तपास आज सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आला. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी पुणे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाची सर्व कागदपत्रे सीबीआयचे उपअधीक्षक डी. एस. चौहान यांच्याकडे सुपुर्द केली. ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षि शिंदे पुलावर दोघा अज्ञात हल्लेखोरांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळया झाडून २० ऑगस्ट २०१३ रोजी त्यांचा खून केला. पुणे पोलिसांसह राज्यभरातील पोलीस यंत्रणा या खूनाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न केले. पत्रकार केतन तिरोडकर यांनी याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा याकरिता उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती.पुणे पोलिसांनी गेल्या १० महिने कसून याप्रकरणाचा तपास केला. सराईत गुन्हेगारांसह हजारो जणांची चौकशी करण्यात आली. असंख्य फोन कॉल्स तपासले गेले. शेकडो तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. नवी मुंबई येथील सीबीआयच्या गुन्हे विभागात जाऊन पुणे पोलिसांनी यासंदर्भातील तपासांच्या कागदपत्रांचे गठठ्े सीबीआयच्या अधिकार्‍यांकडे सोपविले.सीबीआयचे नेटवर्क संपूर्ण देशभर असल्याने आंतराज्यीय दृष्टिकोनातून तपास करणे सीबीआयला सोपे जाणार आहे. देशाचे लक्ष लागून राहिलेल्या याप्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान सीबीआयपुढे आहे.