शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जुहू-पार्ले परिसरातील वाहतुकीवर निर्बंध

By admin | Updated: August 24, 2016 01:44 IST

२६ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली

मुंबई : गोकुळाष्टमीच्या निमित्ताने श्री हरे राम हरे कृष्ण मंदिर जुहू, विलेपार्ले (पश्चिम) परिसरात २४ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजल्यापासून २६ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.या कालावधीत जनार्दन म्हात्रे रोड, जुहू चर्च रोड, गांधी ग्राम रोड, अल्फ्रेडो क्रियाडो मार्ग, संत ज्ञानेश्वर मार्ग, श्यामराव परुळेकर मार्ग (एन.एस. रोड नं. १३) या रस्त्यांवर गाड्या उभ्या करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मुक्तेश्वर देवालय मार्गावर चांडोक चौकपासून (उत्तरेकडून दक्षिणेकडे) आपत्कालीन सेवेची वाहने, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती व स्थानिक रहिवाशांच्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांना, मुक्तेश्वर देवालय मार्गावर चांडोक चौकपासून (दक्षिणेकडून उत्तरेकडे) सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील. तर श्यामराव परुळेकर मार्ग (एन.एस. रोड नं. १३) वरून संत ज्ञानेश्वर मार्गाकडे जाणारे डावे वळण, देवळे रोड व संत ज्ञानेश्वर रोड जंक्शन येथे (पूर्वेकडून पश्चिमेकडे) वाहतुकीस बंद राहील.मुक्तेश्वर देवालय मार्ग व देवळे रोड जंक्शनकडून (पश्चिमेकडून पूर्वेकडे) जेव्हीपीडी जंक्शनकडे जाणारा मार्ग व बाळकृष्ण जुईकर मार्ग (डीबीजे) हा संत ज्ञानेश्वर मार्गाकडून (पीव्हीआर सिनेमापासून) मुक्तेश्वर देवालय मार्ग (गांधी शिक्षण भवन पर्यंत) हे मार्ग वाहतुकीस एक दिशा राहतील, असेही जाधव यांनी कळविले आहे.वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी जुहू, विलेपार्ले पश्चिम येथील गांधीग्राम रोडवर मुक्तेश्वर मंदिर ते मलकानी हाऊसपर्यंत २४ तास नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. गांधीग्राम रोडवर मलकानी हाऊस ते रिवेरा बिल्डिंगपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना सम-विषम दिनांकास एकाच बाजूस वाहने उभी करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे अपर पोलीस आयुक्त सुनील पारसकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी>‘सम-विषम’ परवानगीजुहू, विलेपार्ले पश्चिम येथील गांधीग्राम रोडवर मुक्तेश्वर मंदिर ते मलकानी हाऊसपर्यंत २४ तास नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. गांधीग्राम रोडवर मलकानी हाऊस ते रिवेरा बिल्डिंगपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना सम-विषम दिनांकास एकाच बाजूस वाहने उभी करण्यास परवानगी देण्यात येत आहे.