शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांचे ‘रेटकार्ड’च कोर्टात सादर

By admin | Updated: January 7, 2017 06:35 IST

मुंबई वाहतूक पोलीस विभागातील हप्तेवसुलीच्या गोरखधंद्याचा भांडाफोड पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील टोके यांनी उच्च न्यायालयात केला

मुंबई : मुंबई वाहतूक पोलीस विभागातील हप्तेवसुलीच्या गोरखधंद्याचा भांडाफोड पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील टोके यांनी उच्च न्यायालयात केला असून ट्रॅफिक पोलिसांच्या हप्तेखोरीचे दरपत्रकच (रेटकार्ड) त्यांनी न्यायालयात सादर केले आहे.पोलीस सेवेत असलेल्या हेडकॉन्स्टेबल सुनील टोके यांनी अ‍ॅड. दत्ता माने यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेसोबत व्हिडीओ पुरावाही सादर केला आहे. या याचिकेत टोके यांनी वाहतूक विभागात सध्या सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात दाद मागितली आहे. भ्रष्टाचारात सामील होण्यास नकार दिल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आपला छळ होतो, असा आरोपही त्यांनी केला. पोलीस हेडकॉन्स्टेबल टोके यांनी याचिकेत वाहतूक पोलीस विभागावर केलेले आरोप गंभीर आहेत. प्रत्येक वाहतूक विभागात दोन हवालदारांची हफ्ता वसुलीसाठी नियुक्ती केली जाते, असा दावाही त्यांनी केला असून, यासंदर्भात वारंवार तक्रार दाखल करूनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे न्यायालयाचे दार ठोठावले, असे टोके यांचे म्हणणे आहे. या याचिकेवर २३ जानेवारी रोजी सुनावणी अपेक्षित आहे. >अशी होते हप्तावसुलीकॉर्पोरेट कंपन्या आणि बड्या हॉटेल्सकडून बेकायदेशीर पार्किंगसाठी दरमहा ४० ते ५० हजार रुपयांचा हप्ता.कॉर्पोरेट कंपन्यांकडून रस्ते खोदकामाच्या कामासाठी ५० हजार ते १ लाख रुपये टीव्ही सीरियल, सिनेमा शूटिंगसाठी ५० हजार ते १ लाख रुपये ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’ प्रकरणात ५ ते १० केसेसचे टार्गेट असतानाही ४० ते ५० केसेस. मात्र, कागदोपत्री केवळ ५ ते १० केसेसची नोंद विनापरमिट रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून दरमहा १ ते २ हजार रुपये पिझ्झा डिलीवरी करणाऱ्यांकडून दरमहा २० ते २५ हजार रु . टू-व्हीलर शोरूमकडून ५ हजार, फोर-व्हीलर शोरूमकडून १० हजार टँकर चालकाकडून दिवसाला १०० ते २००  जकात चुकविणाऱ्या वाहनाकडून ४ ते ५ हजार रुपये  सिमेंट मिक्सर, रेती, विटांची वाहतूक करण्यासाठी बिल्डरांकडून महिना २५ ते ३० हजार रुपये ओव्हरलोडिंग ट्रककडून दिवसाला ३ ते ४ हजार विनापरवाना चालणाऱ्या स्कूल बसचालकाकडून दरमहा १००० ते २०००