शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक धिम्या गतीने , क्रेनच्या मदतीन उलटलेला टँकर हटवला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 8:49 AM

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर  सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक मंदगतीने सुरू असतानाच मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे धिम्यागतीने सुरू आहे. चिपळूण येथील लोटे औद्योगिक वसाहतीजवळ टँकर उलटल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

मुंबई: रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यात दाभिळ येथे ॲसिडचा टँकर उलटून वायूगळती झाल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. तीन तासांनी वायूगळती थांबवून रस्ता धुतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. सुट्ट्यांमुळे महामार्गावरील वाहतूक वाढलेली असताना हा अपघात झाल्याने अनेक वाहने रखडली.नायट्रेट ॲसिडची वाहतूक करणारा एक टँकर शनिवारी मध्यरात्री दाभिळ येथे उलटला. रस्त्याच्या कडेला तो पडला असल्याने वाहतूक सुरू होती. मात्र पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास या टँकरमधून वायूगळती सुरू झाली. त्यामुळे पोलिसांनी वाहतूक थांबवली.प्रथम वायूगळती थांबवण्यात आली. क्रेनच्या सहाय्याने टँकर हलवण्यात आला. मात्र रस्यावर नायट्रेट ॲसिड पसरले होते. त्यामुळे औद्योगिक वसाहतीचा अग्निशमन बंब आणून रस्ता धुण्यात आला. तब्बल तीन तासांनी वाहतूक पूर्ववत झाली. मात्र तोपर्यंत असंख्य वाहने रस्त्याच्या दुतर्फा खोळंबली होती.

 एक्सप्रेस-वे: मुंबईकडे जाणारी वाहने एक तासाच्या अंतराने सोडणार-

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सलग सुट्टयांमुळे आज दुसर्‍या दिवशीही झालेली वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जाणारी वाहने लोणावळा एक्झिट जवळ रोखून धरण्याचा निर्णय महामार्ग पोलीसांनी घेतला आहे. एक एक तासाच्या अंतराने ही रोखलेली वाहने पुन्हा सोडण्यात येणार आहेत. या एक तासाच्या दरम्यान मुंबईहून पुण्याकडे येणारी सर्व वाहने ही मुंबई व पुणे या दोन्ही मार्गिकांवरुन सोडण्यात येणार असल्याचे महामार्गचे पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनी सांगितले.सलग सुट्टयांमुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज दुसर्‍या दिवशी देखिल खंडाळा ते आडोशी बोगदा दरम्यान व खालापुर टोलनाका परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. लाख प्रयत्न करुन देखिल वाहनांची संख्या वाढल्याने ही कोंडी सुटत नसल्याने यावर पर्याय म्हणून द्रुतगती मार्गावरुन मुंबईकडे जाणारी सर्व वाहने लोणावळा एक्झिटजवळ थांबविण्यात येणार आहे. यापैकी लहान वाहने लोणावा शहरातून सोडण्यात येतील व अवजड वाहने पुर्णपणे थांबविण्यात येणार आहे. एक एक तासाच्या अंतराने ही वाहने सोडण्यात येतील. या दरम्यान मुंबईकडून येणारी सर्व वाहने ही मुंबई व पुणे या दोन्ही मार्गीकांवरुन सोडण्यात येणार आहे. याकरिता महामार्ग पोलीसांचा ताफा द्रुतगतीवर तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईPuneपुणेAccidentअपघातtraffic policeवाहतूक पोलीसMumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेTrafficवाहतूक कोंडी