शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांना हवा सन्मानाचा ‘टोल’!

By admin | Updated: March 21, 2015 02:28 IST

एरव्ही ‘टोल’धाडीतून राज्यातील जनतेची सुटका व्हावी, यावर सोईस्कर भूमिका घेणारे लोकप्रतिनिधी स्वत:च्या हक्कांसाठी कसे एकजूट करतात, याचा पुनर्प्रत्यय शुक्रवारी विधान परिषदेत आला.

फायद्याचे बोला : टोलनाक्यांवरील सवलतींसाठी सारे सरसावलेमुंबई : एरव्ही ‘टोल’धाडीतून राज्यातील जनतेची सुटका व्हावी, यावर सोईस्कर भूमिका घेणारे लोकप्रतिनिधी स्वत:च्या हक्कांसाठी कसे एकजूट करतात, याचा पुनर्प्रत्यय शुक्रवारी विधान परिषदेत आला. टोलमाफी असली तरी टोलनाक्यांवरील कर्मचाऱ्यांनी आम्हाला ओळखले पाहिजे. ओळखपत्र दाखविण्याची वेळ यायलाच नको, अशी अफलातून मागणी आमदारांनी केली. अहो आश्चर्यम्!! शासनाने ती मागणी ताबडतोब मान्यही केली. नवी मुंबई येथील खारघर टोलनाका बंद करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषदेच्या प्रश्नोत्तर तासात उपस्थित होताच काँग्रेसचे अनंत गाडगीळ, राष्ट्रवादीचे विक्रम काळे, दीपक साळुंखे यांच्यासह बहुसंख्य विधान परिषद सदस्यांनी मूळ प्रश्नाला बगल देत चर्चा स्वत:च्या टोलमुक्तीवर आणली. टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी आम्हाला ओळखलं पाहिजे, आमच्या मालकीच्याच नव्हे, तर ज्या गाडीत आम्ही बसलेले असू त्याला टोलमाफी मिळायला हवी. तशी सक्त ताकीदच सरकारने टोलवाल्यांना द्यावी, अशा एक ना अनेक सूचनांचा भडिमार आमदारांनी केला. सभागृह अक्षरश: डोक्यावर घेतले. राज्यातील टोलनाक्यांवर आजी आणि माजी आमदारांना टोलमाफी आहे; पण तिथे आमचा सन्मानही राखला पाहिजे, अशी भूमिका सदस्यांनी घेतली. सदस्यांचा आक्रमक पवित्रा पाहून बांधकाम खाते तसेच एमएसआरडीसीकडून टोल कंत्राटदारांना आजच कठोर परिपत्रक जारी करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. (प्रतिनिधी)कर्मचारी म्हणजे ओवाळून टाकलेली पोरं..!टोलनाक्यावर कसा त्रास दिला जातोय याची वर्णनं आमदार करीत होते. टोलनाक्यांवर होणाऱ्या त्रासाचे एकेक किस्से सदस्य सांगत होते. सोलापूरचे आ. दीपकराव साळुंखे यांनी तर धमालच उडवून दिली. ते म्हणाले की सभापती महोदय, टोलनाक्यावर वसुली करायला बसवलेली पोरं सगळ्या गावावरून ओवाळून टाकलेली आहेत. त्यांना काय बोलायचं, कसं बोलायचं कायपण कळत नाही! त्यांच्या या वक्तव्यावर सभापतींनाही हसू आवरता आले नाही.च्राज्यभरातील टोलसंदर्भात अलीकडेच मुख्यमंत्र्यांसमोर एक सादरीकरण झाले. यात टोलनाक्यांवरील गर्दी कमी करणे तसेच वेळ वाचविण्याबाबत चर्चा झाली. क्रेडिट कार्डद्वारे टोल भरता यावे यासाठी ‘महापास’ वितरीत करणे, स्वतंत्र ई-वे उपलब्ध करून देणे अशा अनेक उपायांवर चर्चा झाली असून लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.विधिमंडळ अर्थसंकल्पीयअधिवेशनमुंबईतील जुन्या इमारतींतील भाडेकरूंचा सर्व्हे करून महापालिका कायद्यात तशी सुधारणा करण्याबाबत सरकार सकारात्मक पावले उचलेल, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले.