शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आजचा दिवस मराठी नाटकांचा..!

By admin | Updated: January 26, 2017 05:25 IST

मराठी नाट्यसृष्टीवर झालेला नोटाबंदीचा परिणाम हळूहळू ओसरू लागला आहे. मराठी नाटकांना सध्या उधाण आल्याचे चित्र आहे. त्याचेच थेट प्रतिबिंब

राज चिंचणकर / मुंबईमराठी नाट्यसृष्टीवर झालेला नोटाबंदीचा परिणाम हळूहळू ओसरू लागला आहे. मराठी नाटकांना सध्या उधाण आल्याचे चित्र आहे. त्याचेच थेट प्रतिबिंब आजच्या प्रजासत्ताक दिनी पडलेले दिसणार आहे. याचे कारण म्हणजे, नवीन वर्षातल्या या पहिल्यावहिल्या सार्वजनिक सुट्टीचा मुहूर्त साधत, आज मुंबई परिसरातल्या सर्वच नाट्यगृहांत मराठी नाटकांचे धडाक्यात प्रयोग लावण्यात आले आहेत. मुंबई आणि मुंबईच्या आसपास असलेल्या नाट्यगृहांच्या आजच्या तारखा नाट्यप्रयोगांनी फुल्ल झाल्या आहेत. आजचे आघाडीचे अनेक कलावंत या विविध नाटकांत भूमिका साकारत आहेत. या प्रयोगांना मायबाप रसिकांकडून ‘तथास्तु’ असा भरभरून आशीर्वाद मिळवण्याच्या प्रतीक्षेत मराठी नाट्यसृष्टी आहे. दादरच्या शिवाजी मंदिरात, सकाळच्या प्रहरी, आजच्या आघाडीच्या कलावंतांची फौज असलेल्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकाचा प्रयोग आहे, तर विलेपार्लेच्या दीनानाथ नाट्यगृहात सकाळी प्रशांत दामलेच्या ‘साखर खाल्लेला माणूस’ या नव्या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या ‘कोडमंत्र’ या नाटकाचे दोन प्रयोग आज एकाच दिवशी आहेत. दुपारच्या वेळेत माटुंग्याच्या यशवंत नाट्यगृहात, तर रात्री दीनानाथ नाट्यगृहात हे प्रयोग आहेत. शिवाजी मंदिरात रात्रीच्या सत्रात अभिनेत्री श्वेता पेंडसेचे ‘आईचं पत्र हरवलं’ हे नवीन नाटक रंगणार आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधवची प्रमुख भूमिका असलेले ‘गेला उडत’ हे नाटक दुपारी परळच्या दामोदर नाट्यगृहात आहे, तर अभिनेता जितेंद्र जोशीचे ‘दोन स्पेशल’ हे नाटक दीनानाथ नाट्यगृहात दुपारी रंगणार आहे. या सगळ्या धामधुमीत काही महत्त्वाचे योगही जुळून आले आहेत आणि ते म्हणजे, ‘तीन पायांची शर्यत’, ‘दीपस्तंभ’, व ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या तिन्ही नाटकांचे रौप्यमहोत्सवी प्रयोग दुपारी अनुक्रमे शिवाजी मंदिर, डोंबिवलीचे सावित्रीबाई फुले नाट्यगृह व बोरीवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात आहेत.