शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

टिळक पुतळा प्रकरण हायकोर्टात

By admin | Updated: May 14, 2015 02:29 IST

बोरीवलीतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याने वाहनचालकांना समोरील सिग्नल दिसत नसल्याने हा पुतळा तेथून हलवावा की त्याची उंची कमी करावी

मुंबई : बोरीवलीतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याने वाहनचालकांना समोरील सिग्नल दिसत नसल्याने हा पुतळा तेथून हलवावा की त्याची उंची कमी करावी, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाच्या तज्ज्ञ समितीला दिले आहेत.याप्रकरणी बोरीवलीतील रचना चव्हाण यांनी जनहित याचिका केली आहे. हा पुतळा रस्त्याच्या मध्यभागी असल्याने वाहनचालकांना समोरचा सिग्नल दिसत नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यावर हा पुतळा येथून हलवावा किंवा त्याची उंची कमी करावी, असे मत वाहतूक पोलिसांनी सादर केले. त्यानुसार महापालिकेने या पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला व तसे न्यायालयाला कळवले.त्यानंतर येथील स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांनी न्यायालयात अर्ज सादर करून या पुतळ्यासंदर्भात राज्य शासनाच्या या विषयातील तज्ज्ञ समितीचेही मत जाणून घ्यावे, अशी मागणी केली. त्याची दखल घेत न्यायालयाने या तज्ज्ञ समितीला टिळकांच्या पुतळ्याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच हा अहवाल येईपर्यंत पालिकेने पुतळ्याची उंची कमी करण्यासंदर्भात कोणतीही कारवाई करू नये, असेही न्यायालयाने सांगितले आहे.