शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
2
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
3
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
4
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
5
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
6
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
7
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
8
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
9
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
10
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
11
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
12
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
13
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
14
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
15
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
16
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
17
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
18
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
19
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
20
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या तिकीट आरक्षणाचे कोट्यवधी रुपये शासनाकडे थकीत

By admin | Updated: January 5, 2015 00:51 IST

राज्य शासन काही विशिष्ट प्रवाशांना एसटी प्रवासात आरक्षणाची योजना मागील अनेक वर्षांपासून राबवीत आहे. या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची सवलत राज्य परिवहन महामंडळ

वर्धा : राज्य शासन काही विशिष्ट प्रवाशांना एसटी प्रवासात आरक्षणाची योजना मागील अनेक वर्षांपासून राबवीत आहे. या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची सवलत राज्य परिवहन महामंडळ (एस.टी.) प्रवाशांना आरक्षणाच्या नावावर देत आहे. ही रक्कम राज्य शासनाकडून महामंडळाला अल्पावधीत मिळणे आवश्यक आहे. मात्र वर्षभरापासून ती रक्कम थकीत असल्यामुळे याचा फटका एसटीला सहन करावा लागत आहे.
एसटी प्रवासात विद्यार्थ्यांना दोन तृतीयांश म्हणजे ६६ टक्के आरक्षण दिले जाते. ज्येष्ठ नागरिक व अपंगांना प्रत्येकी ५० टक्के, कर्करोग रुग्ण व अंधांना १०० टक्के आरक्षणाची योजना आहे. रापमच्या राज्यभरातील ३१ विभागांमार्फतही योजना अविरतपणे राबविली जात आहे. लहान जिल्हा असतानाही वर्धा विभाग महिन्याकाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचे आरक्षण संबंधित प्रवाशांना देत आहेत. वर्षाकाठी ही रक्कम ३० कोटींच्या घरात जाते.
क्षेत्रफळ आणि लोकसंख्येने मोठे असलेल्या विभागात ही रक्कम वर्षाला ७० कोटींच्या घरात जाते. एकूणच राज्यातील ३१ विभागाची गोळा बेरीज केली तर हा आकडा मोठा होतो. ही रक्कम शासनाकडून रापमला एकमुस्त न देता टप्प्याटप्प्याने मिळत आहे. वर्षभरापासून ही रक्कम शासनाकडेच थकीत आहे. याबाबत रापमच्या वरिष्ठस्तरावरुन सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. ही आधीच अडचणीत असलेला या विभागाला हे नवे आर्थिक संकट भेडसावत आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
रापमच्या बहुतांश गाड्या भंगारावस्थेत
राज्य परिवहन महामंडळामार्फत शासन अनेक योजना राबवितात. मात्र त्याची रक्कम शासन वेळेत व सरसकट चुकती करीत नसल्यामुळे याची झळ विभागाला सोसावी लागत आहे. महामंडळाकडे बसेस दुरुस्तीसाठीही आर्थिक चणचण आहे. याच कारणाने एसटी बसेस भंगारावस्थेत असतानाही रस्त्यांवरुन प्रवाशांना जीव धोक्यात घालून धावत आहे.