शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

तीन मुली नक्षली चळवळीत?

By admin | Updated: October 1, 2015 03:14 IST

आम्ही नक्षल चळवळीत सामील झालो आहोत, असा दावा करणारे एक पत्रक जानेवारी महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या नावे आल्याने भामरागड तालुक्यात

गडचिरोली : आम्ही नक्षल चळवळीत सामील झालो आहोत, असा दावा करणारे एक पत्रक जानेवारी महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या नावे आल्याने भामरागड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थिनींचा ठावठिकाणा लागत नसल्यामुळे त्या खरंच नक्षली चळवळीत सामील झाल्या का, या विषयी साशंकता असतानाच पोलिसांनी मात्र नक्षल्यांनी त्यांना पळवून नेल्याचा दावा केला आहे.लाहेरी येथील शासकीय पोस्ट बेसिक शाळेतील सहा विद्यार्थी जानेवारीमध्ये बेपत्ता झाले होते. त्यातील तीन विद्यार्थी पुन्नामल्ली चेन्नई येथून परत आणण्यात पोलिसांना यश आले. मात्र तीन विद्यार्थिनी अद्याप परतल्या नव्हत्या. अलीकडेच त्यांच्या नावे छापलेले पत्रक नक्षलींनी जारी केले. त्यात ‘आपण क्रांतिकारी चळवळीत (नक्षल दलममध्ये) जुळल्याने आम्हाला कुठलाच पश्चाताप झालेला नाही. आम्ही आनंदी असून नवा समाज निर्माण करून खरा विकास घडविण्यासाठी कार्यरत राहू,’ असा मजकूर बेपत्ता मुलींच्या नावे आहे. मागील आठ महिन्यांत या तिघींचा सुगावा लागला नाही. किंबहुना आपण नक्षली चळवळीत सामील झाल्याचा त्यांचा निरोपही आला नाही. परंतु आता अचानक एक छापील पत्रक आल्याने गावात खळबळ उडाली असून मुलींचे पालक काळजीत पडले आहेत. दुसरीकडे बेपत्ता मुलींचा शोध घेण्याऐवजी आलेले पत्रक खरे मानून पोलिसांनीही हात झटकल्याने सत्य काय, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. (जिल्हा प्रतिनिधी)---------आपण आदिवासी शेतकरी कुटुंबात जन्मलो, अन्य मुलांप्रमाणे शाळेत जायचो, वसतिगृहात राहून शिक्षण घेत होतो, वसतिगृहात सुविधांचा अभाव व शिक्षकांचे शिकविण्याकडे दुर्लक्ष, विद्यार्थ्यांवर कायम दडपण व दहशत असायची. गुरूजी अनेकदा दारू पिऊन यायचे, विद्यार्थ्यांना मारझोड करायचे, अभद्र व्यवहार करायचे, यामुळे आपण शाळेतून पळ काढून सक्रीय क्रांतिकारी पार्टीत दाखल झालो.-----------हे पत्रक हे नक्षल चळवळीतील नेत्यांनीच लिहिलेले आहे. नक्षल दलममध्ये महिलांवर प्रचंड अत्याचार करतात. हे आत्मसमर्पितांनी सांगितलेल्या कथनातून स्पष्ट झाले आहे. - संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, गडचिरोली