शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

मक्का दुर्घटनेत औरंगाबादेतील तिघांचा मृत्यू

By admin | Updated: September 15, 2015 01:21 IST

सौदी अरेबियातील मक्का मशिदीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच महिलांसह भारतातील १३ यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचे सोमवारपर्यंतच्या शोधमोहिमेतून स्पष्ट झाले आहे.

- जमीर काझी,  मुंबईसौदी अरेबियातील मक्का मशिदीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच महिलांसह भारतातील १३ यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचे सोमवारपर्यंतच्या शोधमोहिमेतून स्पष्ट झाले आहे. यामध्ये तिघे औरंगाबाद येथील असून, १० दिवसांपूर्वी औरंगाबाद विमानतळावरून ते यात्रेसाठी रवाना झाले होते, असे केंद्रीय हज कमिटीतर्फे सांगण्यात आले. शेख जाफर नियामत शेख, हैदर शराफुद्दीन व अल्लाउद्दीन उमर शेख अशी त्यांची नावे आहेत. रविवारी बेपत्ता असल्याचे जाहीर करण्यात आलेल्यांपैकी महिलेसह दोघांचा शोध लागला असून, ते सुखरूप आहेत. नसीरा बेगम, कादीर शेख अशी त्यांची नावे आहेत. दुर्घटनेत जखमी झालेल्या मोहम्मद रफीक शेख, यास्मिनबी शेख आणि नौशाद अजुंम अन्सारी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. मृतांपैकी ६४वर्षीय जाफर शेख हे औरंगाबाद येथील पैठण तालुक्यातील बालनागमधील हुसेन कॉलनीमध्ये मुलगा झाकीरसमवेत राहात होते. कमिटीमार्फत हजसाठी ते एकटेच ‘ग्रीन’ या गटातून गेले होते. त्यांच्याशिवाय हैदर शराफुद्दीन व अल्लाउद्दीन उमर शेख हेही औरंगाबाद येथील असून, त्यांचा तपशील अद्याप मिळू शकला नसल्याचे हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अता-ऊर रहमान यांनी सांगितले. मृत भारतीय यात्रेकरूमोहम्मद हनीफ, तब्बसुम (उत्तर प्रदेश), हसन खराज (जम्मू काश्मीर), जाफर शेख, हैदर सराफुद्दीन, अल्लाऊद्दीन उमर शेख (महाराष्ट्र), झकीरा बेगम (कर्नाटक), फातिमा बेगम, अब्दुल कादर (आंध्र प्रदेश), मोनिझा अहमद (पश्चिम बंगाल), याशिवाय प्रायव्हेट टुर्समार्फत गेलेल्या शमीम बानो, कादरबी, मोमीना इस्माईल या तिघांचा मृत्यू झाला आहे.