शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

ठामपाच्या महासभेत शिवसेना - राष्ट्रवादी नगरसेवकांत धक्काबुक्की

By admin | Updated: November 21, 2014 02:34 IST

: पालिकेचा ढासळलेला आर्थिक डोलारा, डेंग्यूचा वाढता फैलाव आदींसह विषयपत्रिकेवर महत्त्वाचे विषय असताना त्या विषयांवर चर्चा करण्याऐवजी गु

ठाणे : पालिकेचा ढासळलेला आर्थिक डोलारा, डेंग्यूचा वाढता फैलाव आदींसह विषयपत्रिकेवर महत्त्वाचे विषय असताना त्या विषयांवर चर्चा करण्याऐवजी गुरुवारच्या महासभेत जवखेडे येथे झालेल्या दलित हत्याकांडाच्या निषेधावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले. या विषयावर एक तास सभा तहकूब करण्याऐवजी या घटनेचा निषेध म्हणून सभा पूर्णवेळ तहकूब करण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी डायसवरच महापौरांना घेरले. या वेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाल्याचे बघायला मिळाले.पालिकेचा आर्थिक डोलारा कोलमडण्यात आणि शहरात डेंग्यूवर आळा बसविण्यात सत्ताधारी कमी पडल्याचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी अंत्ययात्रा काढली. परंतु, तोपर्यंत महासभा सुरू होऊन सुरुवातीला प्रश्नोत्तरे घेण्याऐवजी महापौर संजय मोरे यांनी जवखेडे येथे झालेल्या दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ सभा तहकुबीला प्राधान्य दिले. चर्चा करण्याची भूमिका त्यांनी सुरुवातीला घेतली होती. परंतु, आंदोलनकर्ते सभागृहात घुसल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सभा एक तासासाठी तहकूब केली. त्यानंतर, पुन्हा सभा सुरू होताच विरोधकांनी त्याच मुद्द्याला हात घालून सभाशास्त्रानुसार महापौर सभा चालवत नसल्याचा आरोप करून संपूर्ण वेळ सभा तहकूब करण्याच्या मागणीवर अडून बसले. विरोधक शांत होत नसल्याने महापौरांनी जेवणाची सुटी जाहीर केली. या सुटीनंतर सत्ताधाऱ्यांनी सभा तहकुबीला बगल देऊन प्रश्नोत्तराला सुरुवात केली. सचिवांनी विषय वाचण्यास सुरुवात करताच काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी डायसवर धाव घेऊन त्यांच्याकडील विषयपत्रिका खेचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकही डायसवर धावून गेले. सत्ताधारी येताच डायसवर एकच गोंधळ उडाला. त्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय भोईर यांची शिवसेनेचे नगरसेवक संभाजी पंडित आणि बालाजी काकडे यांच्याशी जोरदार धक्काबुक्की झाली. त्यामुळे सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला होता. (प्रतिनिधी)