शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदाच्या व्यूहरचनेतून आता माघार नाही

By admin | Updated: October 10, 2016 03:10 IST

डोंबिवली : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची विशिष्ट तऱ्हेची व्यूहरचना असते. प्रत्येक उमेदवार हा संधीच्या शोधात असतो. त्यामुळे आता मी दाखल केलेला

डोंबिवली : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची विशिष्ट तऱ्हेची व्यूहरचना असते. प्रत्येक उमेदवार हा संधीच्या शोधात असतो. त्यामुळे आता मी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेऊन मागे हटण्याचा प्रश्नच उद््भवत नाही, अशी भूमिका अध्यक्षपदाच्या रिंगणातील उमेदवार प्रवीण दवणे यांनी व्यक्त केली. मी अर्ज भरण्यामागे कोणतेही राजकारण नाही, तर साहित्य रसिकांचे मला मिळालेले प्रेमकारण आहे. त्यामुळे पद मिळाले नाही, तरी मी दु:खी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. डोंबिवलीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीला दवणे उपस्थित होते. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताच ती बातमी केवळ माध्यमांतच नव्हे, तर सोशल मीडियावरूनही झळकली. मी उभा राहिल्याने आनंद व्यक्त करून मला पाठिंबा मिळाला. निवडणुकीच्या खर्चासाठी मदतीचे आश्वासन दिले, असे त्यांनी सांगितले. संमेलनात युवक आणि ग्रामीण भागांतील साहित्यिकांना व्यासपीठ मिळायला हवे. साहित्याचा कोणताही विषय सध्याच्या फास्ट जीवनशैलीत ‘ब्रेकिंग न्यूज’ न होता तो ‘लिंकिंग न्यूज’ व्हायला हवा. मला अध्यक्षपद मिळाले, तर सृजनात्मक साहित्यिक काम करण्यावर मी भर देणार आहे. विविध महाविद्यालयांत मराठी भाषेची वाड्.मयमंडळे आहेत. त्यांच्यापर्यंत साहित्य पोहोचवण्याचे काम करणार आहे. संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी भेट देऊन त्याचा कार्यअहवाल साहित्य महामंडळाकडे सादर करेन, असा संकल्पच त्यांनी जाहीर केला. सध्या मातृभाषेचे विद्रूपीकरण होत आहे. मराठी भाषेवर इतर भाषांचे अतिक्रमण वाढले आहे. मराठी भाषिक विद्यार्थी इंग्रजीतून शिक्षण घेतो. तेव्हा तो गणेशाला ‘एलिफंट गॉड’ असे म्हणत असेल, तर तो मराठी असूनही त्यांच्या भाषेचे काय होणार? हे विद्रूपीकरण थांबवण्याचे काम करण्यावर भर देऊ. साहित्याच्या संवेदनशीलतेचा उत्कट पदर हरवता कामा नये. साठच्या दशकातील आमची पिढी साहित्यावर तरली आहे. आमच्या जगण्याचा पाया साहित्य होता. आजचा तरुण निराश आहे. आत्महत्या करीत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)लेखक आपल्या भेटीलाच्संमेलनात ‘लेखक आपल्या भेटीला’ असा एखादा कार्यक्रम करण्याची सूचना दवणे यांनी केली. या भेटीचा फायदा तरुण पिढीला आणि नवोदितांना होईल. च्लेखक कसा घडला, यापासून कसे लिहावे, नकार कसा पचवावा, उद्दिष्ट कसे गाठावे, हे सर्व त्यांना समजेल. त्यांची उमेद वाढेल, असा दाखला त्यांनी दिला.