सच बाहर आया तो...; शेख पिता-पुत्रीवर दाखल होणार गुन्हा, जात पडताळणी समितीकडून कागदपत्रांची शहानिशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 12:32 IST2026-04-17T12:31:37+5:302026-04-17T12:32:03+5:30

Thane News: एमआयएम नगरसेविका सहर शेख व त्यांचे वडील युसूफ शेख यांचे जात प्रमाणपत्र ठाणे जिल्हा जात पडताळणी समितीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यांच्या कागदपत्रांची शहानिशा होईपर्यंत ठोस कारवाई करणे शक्य नाही.

The truth came out...; A case will be registered against Sheikh father and daughter, caste verification committee will verify the documents | सच बाहर आया तो...; शेख पिता-पुत्रीवर दाखल होणार गुन्हा, जात पडताळणी समितीकडून कागदपत्रांची शहानिशा

सच बाहर आया तो...; शेख पिता-पुत्रीवर दाखल होणार गुन्हा, जात पडताळणी समितीकडून कागदपत्रांची शहानिशा

- महेश पवार
मुंबई -  एमआयएम नगरसेविका सहर शेख व त्यांचे वडील युसूफ शेख यांचे जात प्रमाणपत्र ठाणे जिल्हा जात पडताळणी समितीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यांच्या कागदपत्रांची शहानिशा होईपर्यंत ठोस कारवाई करणे शक्य नाही. मात्र, त्यात काही चुकीचे आढळून आल्यास त्यांचे प्रमाणपत्र रद्द करून यंत्रणांची दिशाभूल केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, अशी शक्यता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी वर्तविली आहे.

ठाणे तहसीलदारांच्या अहवालाच्या आधारे सहर व युसूफ यांच्या बोगस जात प्रमाणपत्राबाबत सर्वप्रथम ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. जात प्रमाणपत्राबद्दल तक्रार आल्यास ते रद्द करण्याचा अधिकार जात पडताळणी समितीकडे असतो. त्यानुसार शेख यांचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी ठाणे जात पडताळणी समितीकडे पाठविण्यात आले आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

प्रमाणपत्रासाठी सादर केलेले पुरावे, कागदपत्रे खरी असल्याचे अर्जदारांकडून शपथपत्राद्वारे लिहून घेतले जाते. त्यांनी दिलेली कागदपत्रे खरी आहेत की खोटी हे तपासले जाते. असे असतानाही शेख यांना प्रमाणपत्र कसे मिळाले? कोणत्या अधिकाऱ्याने दिले याची चौकशी केली जाईल. यात अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्यावरही कारवाई होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

सहरबाबत प्राप्त तक्रारीची शहानिशा व तपासणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी काही निष्कर्ष काढला असेल, काही चूक असेल, त्रुटी असेल तर ते समोर येईल. आम्ही कागदपत्रांची स्क्रुटिनी केली असून, त्यातून काही निघणार नाही हा विश्वास आहे. 
- इम्तियाज जलील,  
महाराष्ट्र अध्यक्ष, एमआयएम

बाजू स्पष्ट करणार
शेख पिता-पुत्री दोघेही लवकरच माध्यमांसमोर येऊन बाजू स्पष्ट करतील. सध्या ते मुंबईत नातेवाइकांकडे असून, काही वैयक्तिक कारणांमुळे समोर आले नाहीत. त्यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात वकिलांशी चर्चा सुरू आहे.
लवकरच याबाबत सविस्तर भूमिका मांडली जाईल. निवडणूक आयोगाकडे सादर केलेली सर्व कागदपत्रे अधिकृत आहेत. त्यात कोणतीही बोगस माहिती नाही, असा दावा ठाणे महापालिकेतील एमआयएमचे गटनेते सेफ पठाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. 

पिता-पुत्री संपर्काबाहेर : शेख पिता-पुत्री संपर्काबाहेर असल्याचे समोर आले आहे. सहरने सोशल मीडियावर हे आपल्या विरोधात षड्यंत्र रचले जात आहे. द्वेष करणारे मोठे असले तरी माझा विश्वास त्यापेक्षा मोठा आहे. कठीण काळात आशा सोडू नका. विश्वास ठेवून पुढे वाटचाल करा असे म्हटले आहे. 

Web Title : सच सामने आया तो...? शेख पिता-पुत्री पर मामला दर्ज; दस्तावेज़ों की जाँच।

Web Summary : सहर शेख और उनके पिता का जाति प्रमाण पत्र जांच के दायरे में है। धोखाधड़ी पाए जाने पर, उनका प्रमाण पत्र रद्द कर दिया जाएगा, और अधिकारियों को गुमराह करने के लिए आपराधिक मामला दर्ज किया जाएगा। एमआईएम उनका बचाव कर रही है, जबकि वे पहुंच से बाहर हैं।

Web Title : Truth Exposed? Case Filed Against Sheikh Father-Daughter; Documents Verified.

Web Summary : Sahar Sheikh and her father's caste certificate are under scrutiny. If found fraudulent, their certificate will be cancelled, and a criminal case will be filed for misleading authorities. MIM defends them, while they remain unreachable.