शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
5
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
6
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
7
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
8
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
9
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
10
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
11
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
12
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
13
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
14
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
15
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
16
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
17
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
18
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
19
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
20
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीचे सूर उमटले वाद्यांच्या बाजारात; उलाढाल वाढली, राज्यातील उमेदवारांची खरेदीसाठी धाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 08:15 IST

इच्छुक उमेदवार एका मंडळासाठी किमान २५ हजार रुपयांचे साहित्य देत असल्याचे चित्र दिसत आहे.

- सदानंद औंधेलोकमत न्यूज नेटवर्कमिरज (जि.सांगली) :  आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील विविध पक्षांचे उमेदवार मतदारसंघातील भजनी मंडळांना देण्यासाठी मिरजेतून वाद्ये खरेदी करीत आहेत. यामुळे गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीमुळे मिरजेतील वाद्याच्या बाजारात उलाढाल सुरू आहे. इच्छुक उमेदवार एका मंडळासाठी किमान २५ हजार रुपयांचे साहित्य देत असल्याचे चित्र दिसत आहे.धार्मिक कार्यक्रम, सण, उत्सव व गावोगावी भजनी मंडळांसाठी लागणाऱ्या सतार, तंबोरा, तबला, डग्गा, पखवाज, वीणा, हार्मोनियम, ताशा, ढोल, झांज, गिटार संबळ, हलगी, लेझीम, घुमका, झांज, टाळ, मृदंग ही वाद्ये मिरजेतील बाजारात मिळतात. 

मराठवाडा आणि  विदर्भातही क्रेझ  धनगरी ढोल मिरज परिसरात तयार होतात. पंढरपूर, आळंदी, पैठण यांसह अनेक तीर्थक्षेत्रांत मिरजेतून वाद्ये जातात.आता विधानसभा निवडणुकीमुळे विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या उमेदवारांकडून मिरजेतील वाद्य विक्रेत्यांकडे वाद्यांची मागणी आहे.यामुळे गणेशोत्सवानंतर निवडणुकीमुळे बाजारात उलाढाल असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

दीडशे वर्षांची परंपरासण उत्सवासाठी लागणारे वाद्य, तंतूवाद्य निर्मितीची दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरजेतील तंतूवाद्यांना देशभरातून मागणी आहे. तंतूवाद्यांसोबतच गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासाठी वारकरी, भजनी मंडळे, वाद्य पथकांना लागणारी सर्व वाद्ये मिरजेत मिळतात.निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघातील गावोगावी भजनी मंडळांना देण्यासाठी वीणा, पखवाज, हार्मोनियम, तबला, डग्गा, संबळ, टाळ, ताशा, झांज ही वाद्ये मिरजेतून खरेदी करण्यात येत आहेत. एका मंडळाला ही वाद्ये देण्यासाठी सुमारे २५ हजार रुपये खर्च आहे. एका मतदारसंघात सुमारे ४० ते ५० मंडळांसाठी वाद्यांना दहा लाखांवर खर्च उमेदवार करीत आहेत. यामुळे वाद्य विक्रेत्यांना अच्छे दिन आले आहेत.  

राज्यातील विविध ठिकाणांवरून भजनी मंडळांसाठी मिरजेत वाद्यांच्या बाजारपेठेत मागणी असल्याने पुरवठा करण्याचे काम सुरू आहे. - संजय मिरजकर, वाद्य विक्रेते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४