अपार दुःखाचे दान मिळालेले शापित गंधर्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 11:00 IST2026-04-13T10:58:45+5:302026-04-13T11:00:25+5:30

Asha Bhosle News: मी प्रथम गायक होतो व कालांतराने संगीतकार झालो. यामुळेच की काय मला लतादीदी असी की आशाताई यांना चाली समजावून सांगताना सोपे जायचे. असेदेखील एक- दोन वेळा झाले आहे की, मी दिलेली चाल आशाताईला रुचली नाही व तिने आडमार्गाने ती गायला नकार दिला आहे.

The cursed Gandharva who received the gift of immense suffering | अपार दुःखाचे दान मिळालेले शापित गंधर्व

अपार दुःखाचे दान मिळालेले शापित गंधर्व

- हृदयनाथ मंगेशकर
(ज्येष्ठ संगीतकार व आशाताईंचे बंधू)
मी प्रथम गायक होतो व कालांतराने संगीतकार झालो. यामुळेच की काय मला लतादीदी असी की आशाताई यांना चाली समजावून सांगताना सोपे जायचे. असेदेखील एक- दोन वेळा झाले आहे की, मी दिलेली चाल आशाताईला रुचली नाही व तिने आडमार्गाने ती गायला नकार दिला आहे. मी तिच्या मताचा आदर करत रेकॉर्डिंगदेखील कॅन्सल केले आहे.

बरेचदा भी आशा व लताचा भाऊ म्हणून माझी हेटाळणी व्हायची. ह्याला काय कमी आहे? बहिणींच्या जीवावर मस्त जगू शकतो हा! पण मी कधीही असा विचार केला नाही. मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून होतो. ‘जीवलगा’ गाण्याच्या रेकॉर्डिंगला आशाताई वेळेत पोहोचली पण मला उशीर झाला होता. कारण ती तिच्या कारमधून आली तर मी धक्के खात बसमधून. आम्हा बहीण-भावामध्ये आत्मसन्मान जपणारे नाते होते.

‘जीवलगा’ हे गाणे अनेक अर्थांनी आम्हा भाऊ-बहिणीच्या जीवनात महत्त्वाचे आहे. हे गाणे गाताना आशाताई त्या गाण्यामध्ये इतकी गुंतली होती की तिच्या डोळ्यांमध्ये टचकन पाणी आले होते व दैव-दुर्विलास बघा या गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतरच आशाताईंच्या यजमानांच्या (गणपतराव भोसले) निधनाची बातमी धडकली होती.

माझे असे स्पष्ट मत आहे की आशाताईसारखा संगीत क्षेत्रातील असो, की अन्य कुठल्याही क्षेत्रातील दुसरा कोणी मोठा कलाकार; केवळ नैसर्गिक देणगी मिळाली म्हणून ते कलाकार मोठे होत नाहीत तर नियतीने त्यांच्या पदरात टाकलेल्या अपार दुःखाच्या दानाने ते मोठे होतात. 

कलाकाराच्या हृदयात / मनात सतत सलणाऱ्या काट्याची सल त्याच्या कलेत नकळत ठिबकते व मग समोरच्या माणसालादेखील ती जाणवते आणि आपलीशी वाटते. आशाताई हिच्या शब्दांमध्येच सांगायचे झाल्यास आम्ही मंगेशकर भावंडे ‘शापित गंधर्व’ म्हणून या भूतलावर आलो आहोत. गंधर्व हे शापित असल्याने गाणे व दुःख दोन्ही दाणे आमच्या पदरात देवाने भरपूर घातले आहेत...
    (‘सरस्वामिनी आशा’ पुस्तकातून साभार)

Web Title : एक शापित गंधर्व: अपार दुख का दान, एक संगीतमय यात्रा

Web Summary : हृदयनाथ मंगेशकर आशा भोसले के साथ अपने बंधन, उनकी प्रतिभा और उस दर्द पर विचार करते हैं जो महान कला को बढ़ावा देता है। 'जीवलगा' आशा के लिए बेहद भावनात्मक हो गया, जो उनके पति के निधन के साथ हुआ। कलाकारों की महानता दुख को कला में बदलने की क्षमता से उपजी है।

Web Title : A Cursed Gandharva: Gifted with Immense Sorrow, a Musical Journey

Web Summary : Hrudaynath Mangeshkar reflects on his bond with Asha Bhosle, her talent, and the pain that fuels great artistry. "Jiwalaga" became deeply emotional for Asha, coinciding with her husband's passing. Artists' greatness stems from their ability to channel suffering into art.