शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पाच सदस्यांचे पद रद्द

By admin | Updated: June 10, 2016 01:45 IST

मावळ तालुक्यातील वळक (पो. टाकवे खुर्द) ग्रामपंचायतीच्या ५ सदस्यांचे पद रद्द करण्यात आले आहे

वडगाव : ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च वेळेत सादर न केल्याने मावळ तालुक्यातील वळक (पो. टाकवे खुर्द) ग्रामपंचायतीच्या ५ सदस्यांचे पद रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत शाखा अप्पर जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी या संदर्भातील आदेश दिला आहे. काळूराम गबाजी थोरवे, स्वामी पांडुरंग बांगर, भारती संभाजी जाधव, मनीषा आनंद घनवट, संतोष बबन घनवट (सर्व रा. वळक, पोस्ट टाकवे खुर्द, ता. मावळ, पुणे) अशी सदस्य रद्द झालेल्यांची नावे आहेत. मावळ तालुक्यातील वळक ग्रामपंचायतीची निवडणूक २०१३मध्ये झाली होती. त्यामध्ये ७ जण निवडून आले होते. त्यानंतर सरपंचपदी अवंतिका रणपिसे यांची निवड झाली होती, तर उपसरपंचपदी काळूराम थोरवे यांची निवड झाली होती. काही कालखंडानंतर सदस्यांनी रणपिसे यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. दरम्यानच्या कालखंडात ग्रामपंचायतीतील ५ सदस्यांनी वेळेवर निवडणूक खर्च सादर केला नाही. याबाबत अवंतिका रणपिसे यांनी तक्रार दाखल केली होती. संबंधित सदस्यांनी वेळेत निवडणूक खर्च सादर केला नाही म्हणून त्यांचे पद रद्द करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार यावर सुनावणी झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडून याबाबत माहिती घेतली असता संबंधित सदस्यांनी खर्च सादर न केल्याचे आढळून आले. त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी यांनी उपसरपंचासह ५ जणांचे सदस्यपद रद्द केले आहे. तसेच पुढील २ वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातील आदेश ८ जूनला दिला असून, तो गुरुवारी ग्रामपंचायतीला मिळाला आहे. अ‍ॅड. अकबर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. सचिन लोंढे यांनी कामकाज पाहिले, तर अ‍ॅड. जे. पी. धायलडक यांनी युक्तिवाद केला. (वार्ताहर)