शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार वनगुन्हे अद्यापही प्रलंबित

By admin | Updated: December 25, 2014 23:34 IST

पुरावे गोळा करण्यात अपयश : वृक्षतोड व वनअतिक्रमणाचे आव्हान.

नीलेश शहाकार / बुलडाणा:जंगलाचे संरक्षण आणि वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने आधुनिक साधनांचा वापर करून अनेक उपक्रम सुरू केले असले, तरी वनगुन्हे निकालात काढण्याची गती वाढलेली नाही. राज्यात सध्या दहा हजार वनगुन्हे प्रलंबित असल्याचे वास्तव समोर आले आहे. २0१२-१३ मध्ये राज्यात प्रलंबित असलेल्या वनगुन्ह्यांची संख्या सुमारे १४ हजार २४१ होती. यात २0१४ मध्ये ३१ हजार ४९८ वनगुन्ह्याची भर पडली. मात्र वर्षा अखेरपर्यत झालेल्या एकूण ४१ हजार ४४0 वनगुन्ह्यापैकी ३0 हजार ५२४ गुन्ह्याचा निकाल लावण्यात यश आले. त्यामुळे १0 हजार ९१६ गुन्हे अद्यापही प्रलंबित आहे. राज्यात २0१0-११ मध्ये एकूण ३६ हजार १९३, तर २0११-१२ या वर्षांत ३४ हजार ७७९ वनगुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. वन्यप्राण्यांची शिकार, वृक्षतोड, अवैध चराई, आगी लावणे यासारख्या गुन्ह्यांसाठी कडक शिक्षेच्या तरतुदी केल्या जात असताना विविध कारणांमुळे गुन्हे प्रलंबित राहत असल्याची परिस्थिती आहे. जंगलात वनगुन्हे घडल्यानंतर वनरक्षक गुन्हा दाखल करीत असत आणि २४ तासांनी संबंधित वनरक्षक त्या भागातील वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांना त्याची माहिती देत होते. उपवनसंरक्षकांपयर्ंत संपूर्ण माहिती पोहोचेपयर्ंत आठवडा लागत होता. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गुन्ह्यांच्या नोंदीविषयक माहिती तत्काळ उपलब्ध होत असली तरी गुन्ह्यांचा निपटारा मात्र वेगवान होऊ शकला नाही.वृक्षतोड व अतिक्रमणाचे गुन्हे जास्तगडचिरोली,अमरावती,औरंगाबाद,ठाणे,पुणे वनक्षेत्रात वनगुन्हे निकाली काढण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. वनगुन्ह्यांच्या बाबतीत वृक्षतोडी आणि वनजमिनीवरील अतिक्रमण गुन्ह्यांचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. या प्रकरणांमध्ये साक्षीदारांपासून ते सर्व प्रकारचे पुरावे गोळा करण्यासाठी लागणार्‍या मोठय़ा कालावधीमुळे गुन्हे प्रलंबित राहतात. जंगलात होणारी अवैध चराई रोखणे, वृक्षतोडीला आळा घालणे ही मोठी आव्हाने सध्या वनविभागासमोर आहेत.