शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘तात्पुरते’ बसले अडून!

By admin | Updated: May 6, 2015 04:30 IST

मंत्री आस्थापनेवरील सर्व पदे भरण्यात आली तरी १२५ ‘तात्पुरते’ कर्मचारी मूळ विभागात परत जाण्यास तयार नाहीत.

यदु जोशी, मुंबईराज्यातील मंत्र्यांकडे तात्पुरत्या स्वरूपात गेलेले अधिकारी-कर्मचारी तिथे चांगलाच ठिय्या मांडून बसले आहेत. मंत्री आस्थापनेवरील सर्व पदे भरण्यात आली तरी हे १२५ ‘तात्पुरते’ कर्मचारी मूळ विभागात परत जाण्यास तयार नाहीत.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर विविध विभागांनी आपल्याकडील कर्मचाऱ्यांना मंत्री आस्थापनेवर तात्पुरत्या स्वरूपात पाठविले. पीए, पीएस, ओएसडी, लिपिक, टंकलेखक, शिपाई आदी पदांवर गेलेले हे कर्मचारी तिथे असे काही रमले, की मूळ विभागात परतण्याचे नाव ते घेत नाहीत. अल्पाधितच त्यांनी एकनाथ खडसे, विनोद तावडे अशा वजनदार मंत्र्यांशी सूत जमविल्यामुळे विभाग प्रमुखांनी ‘परती’चा आदेश काढला तरी त्यांनी त्यास जुमानले नाही. मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात बाहेरील व्यक्तींना कर्मचारी/ अधिकारी म्हणून सामावून घेण्यात आले आहे. त्यांना सहसचिव, उपसचिव आदी पदांचा दर्जाही देण्यात आला आहे. या सर्वांना महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ लागू करण्यात आला आहे. विधी व न्याय विभागाचा सल्ला घेऊनच सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचे सर्व नियम त्यांना लागू झाले आहेत. सामान्य प्रशासन विभागातून पाच कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या मंत्री आस्थापनेवर पाठविण्यात आले होते. मात्र ते कर्मचारी मूळ विभागात परत येईनात. म्हणून विभागाने आदेश काढून त्यांना मूळ विभागात तीन दिवसांत रुजू व्हा नाहीतर वेतन रोखू, असा दम दिल्यावर ते विभागात परतले.... तपासणीनंतर निर्णयप्रत्येक मंत्री आस्थापनेवर किती कर्मचारी/अधिकारी असतील याचा एक आकृतीबंध असतो. त्यानुसार पदे भरण्यात आल्यानंतर कर्मचारी अतिरिक्त ठरतात का ते तपासले जाईल. तात्पुरत्या स्वरुपात पाठविलेले कर्मचारी अतिरिक्त असतील तर त्यांना त्यांच्या विभागामध्ये परत जावे लागेल. - स्वाधीन क्षत्रिय, मुख्य सचिव. या नियमातील काही तरतुदीच्कर्मचाऱ्यांना वा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देणग्या घेता येणार नाहीत.च्सार्वजनिक ठिकाणी मादक पेय किंवा मादक औषधी द्रव्यांचे सेवन करता येणार नाही.च्संपत्तीचे विवरण नियमितपणे सरकारकडे सादर करावे लागेल.च्शेअरची खरेदी विक्री करता येणार नाही.च्धार्मिक तेढ पसरविणाऱ्या संघटनेचे सदस्य होता येणार नाही. च्कोणताही कर्मचारी दूरचित्रवाणी किंवा आकाशवाणीच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही किंवा वृत्तपत्र वा नियतकालिकाकडे लेख व पत्र पाठवू शकणार नाही.